इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगातले सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन म्हणून प्रसिद्ध असलेले गूगल हे नेहमीच आपल्या होम पेजवर एक डूडल प्रसिद्ध करून काही नामवंतांची आठवण करून देत असते, रविवारी याच डूडल वर भारताचे नामवंत, गामा पहिलवान याचे डूडल यांच्या १४४ व्या जन्मदिवशी प्रसिद्ध करून गूगलने त्यांना मानवंदना दिली.
‘सुलतान’ चित्रपटाच्या यशानंतर सलमान खान आणि त्याची प्राॕडक्शन कंपनी गामा पहिलवान यांच्यावर एक सिरीज तयार करण्याच्या तयारीत आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून अनेक कौटुंबिक आणि तांत्रिक कारणामुळे या सिरिजचे शूटिंग रखडले असल्याचे सांगितले जाते.
कोण आहेत गामा पहिलवान?
गुलाम मोहम्मदबक्ष बट हे त्यांचे मूळ नाव १८७८ ला अमृतसरमध्ये त्यांचा जन्म झाला. रहिमबक्ष सुलतानीवाला या ७ फूट उंचीच्या तगड्या कुस्तीगीरासमोर ज्या वेळेला ‘रुस्तम-ए-हिंद’ या मानाच्या कुस्तीसाठी गामा पहिलवान भिडले त्या वेळी त्याची उंची ५ फूट ७ इंच होती. सुलतानीवाला या पहिलवानाचा असलेला दबदबा बघुन, हा पोरगा निश्चितपणे हरणार, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात गामा पहिलवान यांना यश मिळाले. आणि तिथूनच एका रात्रीत या कुस्तीपटूची ओळख जगाला झाली.
त्यांच्या ५२ वर्षांच्या लांबलचक कारकिर्दीत ते कधीही पराभूत झाले नाहीत अशी त्यांची ख्याती आहे. प्रतिस्पर्ध्याला अवघ्या एका मिनिटात चित करण्याची क्षमता असलेला कुस्तीपटू म्हणून त्यांची ओळख होती १९५२ साली त्यांनी कुस्ती क्षेत्रातून निवृत्ती घेतली. त्यावेळेला त्यांचे वय ७४ होते हे सगळ्यात विशेष. दिवसाला १० लिटर दूध, ६ देशी कोंबड्या आणि २०० ग्रॅम बदाम घातलेला ज्यूस असा त्यांचा आहार होता.
भारत-पाकिस्तान फाळणी नंतर ते लाहोरला स्थायिक झाले. पुढे १९७१ साली गामा पहिलवान यांची नात कुलसुम नवाज हिचा विवाह पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबत झाला. गुलाम पहिलवान हे दिवसाला पाच हजार स्क्वॕटस आणि तीन हजार पुशअप्स इतका तगडा व्यायाम करण्यासाठी प्रसिद्ध होते. मार्शल आर्टस् आणि त्यावर आधारित चित्रपटातले मोठे नाव असलेल्या ब्रुसलीने देखील गामा पहिलवान यांच्याकडून काही टीप्स घेतल्या होत्या. १९०२ साली ते २४ वर्षे वयाचे होते. त्यावेळी त्यांनी सयाजी बागेतल्या बरोडा म्युझियम मध्ये चक्क १२०० किलोचा दगड उचलून सगळ्यांना आश्चर्यचकित केले होते.
https://twitter.com/GoogleDoodles/status/1528224147884621824?s=20&t=2-nZHL8fsKmutzLd2kQoDw