मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे एकमेकांचे जवळचे मित्र असतात, परंतु त्याचबरोबर काही कलाकारांमध्ये वैचारिक मतभेद असतात, किंबहुना ते एकमेकाचे शत्रू किंवा वैरभाव ठेवणारे आहेत, असे देखील म्हटले जाते. कोण कोणाचा मित्र? कोण कोणाचा शत्रू? याची नेहमी चर्चा होत असते. सध्या देखील अशीच चर्चा रंगली आहे. ती आहे अभिनेता अक्षय कुमार याचा चांगला मित्र कोण शाहरुख, आमिर की सलमान खान? विशेष म्हणजे याबाबत अक्षयनेच खुलासा केला आहे.
अक्षयचा सम्राट पृथ्वीराज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनवेळचा अक्षय कुमारचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो एका मुलाखतीत सांगत आहे की, सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान पैकी त्याचा चांगला मित्र कोण आहे.
अक्षय कुमार आणि डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी अलीकडेच सम्राट पृथ्वीराजच्या प्रमोशनसाठी एका शोमध्ये पोहोचले होते. मुलाखतीत नाविका कुमारने अक्षय कुमारला विचारले, ‘शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान… तुझा चांगला मित्र कोण आहे?’ या प्रश्नाच्या उत्तरात अक्षय कुमार म्हणतो, ‘या तिघांमध्ये मी सलमान खानच्या जवळ आहे.’ सोशल मीडियावर सलमान खानच्या चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडतो.
https://twitter.com/VishalRC007/status/1531671690450567168?s=20&t=lxAY4Rfzw5HbMxYXc1TkAQ
दुसरीकडे मानुषी छिल्लरने अक्षय कुमारसोबत सम्राट पृथ्वीराज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. करणी सेनेच्या प्रचंड विरोधामुळे यशराज स्टुडिओने पृथ्वीराजचे शीर्षक बदलून ‘सम्राट पृथ्वीराज’ केले आहे. करणी सेनेने यशराज स्टुडिओजकडे चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी केली होती.
हा चित्रपट दी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित झाला आहे. डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आणि शौर्यावर आधारित आहे. अक्षय या चित्रपटात सम्राट पृथ्वीराज चौहानची तर मानुषी छिल्लरने पृथ्वीराजची मैत्रीण राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारली आहे.