मुंबई – बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान याला मुंबईत क्रूझमध्ये रेव्ह पार्टी करताना पकडल्याने गेला असून या प्रकरणाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र या प्रकरणात केवळ आर्यन खानच नाही तर त्याच्यासह मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापा टाकत एनसीबीने १२ जणांना अटक केली आहे. त्यात ९ तरुण आणि ३ तरुणींचा समावेश आहे. यात आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला अटक करण्यात आली.
अरबाज आणि मुनमुन यांच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे न्यायालयाने तिन्ही आरोपींना एक दिवसाची कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आर्यन खानला अनेक जण ओळखतात, पण अरबाज मर्चंट व मुनमुन धामेचा कोण आहे? हे तुम्हाला माहिती आहे का? अरबाज मर्चंटचा आर्यन खानबरोबरच सुहाना खानशी विशेष संबंध आहे. एवढेच नाही तर बॉलिवूडच्या अनेक स्टार किड्सचे अरबाज मर्चंटशी संबंध आहेत.
अरबाज मर्चंट अनेक वेळा सुहाना खान, आर्यन खान आणि इतर स्टारकिड्ससोबत पार्टी करताना दिसला आहे. सोशल मीडियावर अरबाज मर्चंटचे खूप फॅन आहेत. अरबाज मर्चंटचे सुमारे ३० हजार फॉलोअर्स आहेत. यामध्ये आर्यन खान, सुहाना खान, अलाया फर्निचरवाला, अनन्या पांडे, अहान पांडे, शनाया कपूर अशा अनेक स्टारकिड्सची नावे समाविष्ट आहेत.
काही काळापूर्वी अशी चर्चा होती की, पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवाला ही अरबाज मर्चंटसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनाही अनेक वेळा एकत्र पाहिले गेले आहे. तसेच अरबाज मर्चंटचे ट्विटर अंकाऊट हे अधिकृतही नाही. अरबाज आणि मुनमुन यांच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आली आहेत. त्यातील मुनमुन धामेचा ही दिल्लीची रहिवासी दिल्लीला जाण्यापूर्वी ती काही काळ भोपाळमध्ये राहिली असून धामेचाही एक फॅशन मॉडेल आहे. मॉडेलिंगद्वारेच ती मोठ्या सेलिब्रिटींच्या संपर्कात आली. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींसोबत मुनमुनचे फोटो आहेत. तिने तिच्या अकाऊंटवर तिच्या मॉडेलिंग फोटोशूटची अनेक छायाचित्रेही शेअर केली आहेत.
दरम्यान, आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाज सेठ मर्चंट या तिघांना अटक केल्यानंतर रविवारी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर सोमवारी सर्वांना जामीन अर्जाच्या सुनावणीसाठी न्यायालयात नेण्यात आले. जिथून एस्प्लान्डे कोर्टाने आर्यनसह मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंटची एनसीबी कोठडी आता दि. ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे.