विशेष प्रतिनिधी, नाशिक
शहरासह जिल्ह्यात आज दिवसभर केवळ एकच चर्चा आहे. ती म्हणजे, शनिवारी आणि रविवारी कुठली दुकाने सुरू राहणार. यासंदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आदेशित केले आहे की, केवळ रुग्णालये, औषध दुकाने, दूध विक्री, वृत्तपत्रांचे वितरण, भाजीपाला, हॉटेल व रेस्टॉरंटमधील केवळ पार्सल सेवा यांनाच परवानगी असेल. बाकी सर्व दुकाने पूर्णतः बंद राहतील. म्हणजे, नाशिक शहरासह जिल्ह्यात वीकेंड कडक लॉकडाऊन असेल, हे स्पष्ट झाले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येत्या १५ जूनपर्यंत शनिवारी आणि रविवारी हा कडक लॉकडाऊन राहणार आहे.
हे आदेश असे