रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नेमकं काय स्वस्त? ओटीटी, चित्रपट की नाटक? बघा ही आकडेवारी

by Gautam Sancheti
ऑगस्ट 25, 2022 | 5:03 am
in मनोरंजन
0
multiplex e1661342023528

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – २००८ मध्ये भारतात ओटीटीचे पदार्पण झाले. त्यानंतर अनेक कंपन्यांनी त्यांचे ओटीटी प्लॅटफॉर्म बाजारात आणले. नवीन मालिका, दर्जेदार कथानक, नवनवीन सिनेमे यामुळे ओटीटीचा प्रेक्षक वर्ग वाढताच राहिला. आज त्याची संख्या दशलक्षच्या घरात आहे. मात्र याचा परिणाम चित्रपटगृह तसेच नाट्यसृष्टीवर झालेला दिसतो. सिनेमा व नाटक यांच्या तिकिटाचे दर देखील कायम आहेत अशात काही ओटीटी प्लॅटफॉर्मनी आपले दर देखील वाढवले आहेत. तरीही त्यांच्या ग्राहकांच्या संख्येत काही फरक पडलेला नाही. उलट ती वाढतेच आहे.

मनोरंजन विश्वात काळानुरूप अनेक बदल झाले आहेत. सुरवातीच्या पडद्यावर मूकपटापासून ते आताच्या सिनेमागृहात थ्रीडीचे चष्मे घालून सिनेमे पाहण्यापर्यंत काळ बदलला आहे. याचसोबत आपले अर्धे जग व्यापलेल्या मोबाइलमध्ये ओटीटीने आपले स्थान मिळवले. सध्याचा काळ ओटीटीचा असून, मनोरंजन विश्वावर ओटीटीने आपली पकड मजबूत केली आहे. दर्जेदार चित्रपट प्रदर्शित होत नसल्याने प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये फिरकेनासे झाल्याने चित्रपटगृह रिकामे राहत असल्याचे भयावह वास्तव आहे. याचा फटका सिनेसृष्टीला बसत आहे.

चित्रपटांबाबत समीक्षा करण्यासाठी निर्माते देखील निरुत्साही होत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर चित्रपटांबाबत सकारात्मक प्रतिक्रिया आल्यावरच प्रेक्षक चित्रपट पाहायचा निर्णय घेत आहेत. काही चित्रपटांचा अपवाद वगळता हाऊसफुल्ल हा शब्द फक्त चित्रपटाच्या नावातच दिसतो. दुसरीकडे नाट्यसृष्टीची परिस्थिती फारशी वेगळी नाही. आताच्या परिस्थितीत नाटकांचे तिकिट दर वाढवण्याची शक्यता नसली तरी कोरोनानंतर रसिक पुन्हा नाट्यगृहांमध्ये परतले हीच मराठी रंगभूमीसाठी दिलासादायक बाब आहे.

महागाई वाढलेली असताना तिकिटांचे दरही वाढवले तर सध्या ५०-६० टक्के मिळणारे बुकींगही कमी होईल अशी भीती रंगभूमीला आहे. यासाठी होईल त्या बिझनेसमध्ये काही निर्माते नुकसान सोसूनही नाटक चालवत आहेत. सध्या नाटकांच्या तिकीटांचे दर २००, ३०० आणि ४०० रुपये असे आहेत. ५०० रुपयांच्या वर तिकिट गेल्यास निर्मात्यांना जीएसटी भरावा लागेल. जीएसटी प्रेक्षकांकडून घ्यायचा तर तिकीट आणखी महागेल. त्यामुळे तूर्तास नाटकांच्या तिकीटांचे दर वाढण्याची चिन्हे नाहीत. पूर्वी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर नवीन नाटके यायची, पण यंदा तसे काही चित्र दिसत नाही.

यंदा नवीन नाटकांचा हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. तर दर्जेदार चित्रपटांची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. अन्यथा आलेला चित्रपट काही दिवसांनी ओटीटीवरच पाहणे प्रेक्षक पसंत करतात. भारतात स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या जवळपास ७६१ दशलक्ष आहे. तर ओटीटी वापरकर्त्यांची संख्या जवळपास ६२ दशलक्षांपर्यंत वाढण्याचे संकेत केपीएमजी या व्यवसाय मार्गदर्शक कंपनीने दिले आहेत. यासह ओटीटीसाठी अगोदरच असलेल्या कंपन्यांसोबत अजूनही काही कंपन्या या बाजारात येत आहेत. ज्यामुळे वापरकर्त्यांना अधिक दर्जेदार सेवा मिळेल.

बघा आकडेवारी काय सांगते
ओटीटी…. एकूण वापरकर्ते
झी5…. १७२ दशलक्ष
ऍमेझॉन प्राईम……. २०० दशलक्ष
डिस्नी हॉटस्टार……… १५२ दशलक्ष
नेटफ्लिक्स…….. २२१ दशलक्ष
प्लॅनेट मराठी…….. ५ लाखांपेक्षा अधिक
आल्ट बालाजी….. ३.८८ दशलक्ष
सोनी लिव्ह……. ११८ दशलक्ष

Which is Affordable OTT Movie or Drama
Entertainment Online Service Audience
Expensive Cheap

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य सरकारची अभिनव योजनाः फळबाग आणि फुलशेतीला मिळणार १०० टक्के अनुदान

Next Post

पैसे मिळविण्यासाठी ठेवीधारकाने बँकेत घातला असा गोंधळ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

modi 111
राष्ट्रीय

पंतप्रधानाच्या हस्ते मणिपूरमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन…

सप्टेंबर 14, 2025
भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा1 971x420 1
संमिश्र वार्ता

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संरक्षण उत्पादन उद्योगासाठी सहाय्यभूत ठरेल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 14, 2025
Kia Range 1
संमिश्र वार्ता

किया इंडियाची घोषणा…ग्राहकांना मिळणार १.७५ लाख रूपयांपर्यंत हा फायदा

सप्टेंबर 14, 2025
crime1
क्राईम डायरी

पत्ता विचारण्याचा बहाणा करुन महिलेची अशी केली फसवणूक…पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सप्टेंबर 14, 2025
rain1
महत्त्वाच्या बातम्या

या दोन दिवसात महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 14, 2025
IMG 20250913 WA0446
महत्त्वाच्या बातम्या

अपघाती मृत्यू प्रकरणी वारसांना एक कोटींची भरपाई… लोकन्यायालयामध्ये प्रकरण निकाली

सप्टेंबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

पैसे मिळविण्यासाठी ठेवीधारकाने बँकेत घातला असा गोंधळ

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011