पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रसिद्ध वाहननिर्माता कंपनी ह्युंदई क्रेटा (Hyundai Creta) आणि ह्युंदई आय ट्वेंटी (i20) हॅचबॅक या कारची नुकतीच क्रॅश टेस्ट घेण्यात आली. टेस्टसाठी GNCAP ने क्रेटा आणि i20 चे एंट्री लेव्हल व्हेरिएंटचा वापर केला होता. हे मॉडेल ड्युएल फ्रंट एअरबॅग, एबीएससह ईबीडी, फ्रंट सिटबेल्ट वॉर्निंग आणि रियर पार्किंग सेंसर स्टँडर्डने सुसज्ज आहे.
ह्युंदई क्रेटा (Hyundai Creta) ला ६५ किलोमीटरच्या वेगाने फ्रंटल ऑफसेट क्रॅश टेस्टमध्ये अॅडल्ट सेफ्टीसाठी ३ स्टार रेटिंग मिळाले आहे. या एसयूव्हीचा बॉडी शेल अस्थिर आढळला असून, तो कारच्या पुढील भागाचा भार सहन करण्यास सक्षम नसल्याचे दिसून आले. त्याशिवाय कारचे फूटरेस्टसुद्धा अस्थिर आढळून आले.
ह्युंदई आय ट्वेंटी (i20) ने एकूण १७ गुणांमधून ८.८४ गुण प्राप्त करून GNCAP च्या क्रॅश टेस्टमध्ये ३ स्टार मिळवले आहेत. i20 ही कार पुढच्या सीटवरील चालक आणि प्रवाशाचे डोके आणि मानेला पुरेशी सुरक्षा प्रदान करते. चाइल्ड ऑक्युपेंसी टेस्टमध्ये या कारने ४९ पैकी ३६.८९ गुण मिळवले आहेत. लहान मुलांच्या मानेला सुरक्षा प्रदान करण्याचे कामही ही कार करते असे टेस्टमध्ये सांगण्यात आले आहे.
त्याशिवाय टोयोटा अर्बन क्रूझरने ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये ४ स्टार रेटिंग मिळवले आहेत. या सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीला अॅडल्ट सुरक्षेसाठी ४ स्टार, तर चाइल्ड ऑक्युपेंट प्रोटेक्शनसाठी ३ स्टार मिळाले आहेत. या कारच्या डबल एअरबॅग, एबीएस (अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टिम), आयसोफिक्स माउंट आणि फ्रंट सिटबेल्ट प्रिटेंशनरने सुसज्ज होते. अर्बन क्रूझरला प्रोटेक्शनमध्ये १७ पैकी १३.५२ गुण मिळाले आहेत. तर मुलांच्या सुरक्षेसाठी ४९ पैकी ३६.६८ गुण मिळाले आहेत.