नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतात 5G सेवा अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे आणि वापरकर्त्यांना अनेक शहरांमध्ये त्यांचे फायदे मिळत आहेत. अर्थात, तुम्हीही हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह 5G सेवांची वाट पाहत असाल. भारती एअरटेलने १ ऑक्टोबरपासून आठ शहरांमध्ये 5G सेवा पुरवण्यास सुरुवात केली आहे आणि रिलायन्स जिओ महिन्याच्या अखेरीस चार शहरांमध्ये 5G सेवा सुरू करेल. 5G रोलआउटबाबत कोणत्या टेलिकॉम ऑपरेटरचा प्लॅन काय आहे ते जाणून घेऊया.
एअरटेल
देशात 5G सेवा सुरू करणारी एअरटेल ही पहिली कंपनी ठरली आहे. १ ऑक्टोबरपासून कंपनीने ८ शहरांमध्ये 5G सेवा देण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली, मुंबई, वाराणसी, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, नागपूर आणि सिलीगुडी येथे 5G सेवा देत आहे. कंपनीचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी सांगितले की, एअरटेल मार्च २०२३ पर्यंत देशातील प्रमुख शहरांमध्ये रोलआउट पूर्ण करेल. देशभरात 5G रोलआउटची प्रक्रिया मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होईल.
रिलायन्स जिओ
रिलायन्स जिओने अलीकडेच ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) सांगितले होते की कंपनी दिवाळीपासून ट्रू 5G सेवा देणे सुरू करेल. २४ ऑक्टोबरला दिवाळीच्या मुहूर्तावर दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे 5G सेवा उपलब्ध होणार आहे. कंपनीचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी स्पष्ट केले आहे की, या वर्षाच्या अखेरीस देशातील सर्व प्रमुख शहरे आणि डिसेंबर २०२३ पर्यंत देशभरातील सर्व वापरकर्त्यांना रिलायन्स जिओच्या 5G सेवांचा लाभ मिळेल. 4G टॅरिफच्या तुलनेत Airtel आणि Jio या दोन्ही योजना महाग होणार नाहीत.
वोडाफोन आयडीया
इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) २०२२ मध्ये 5G लाँच झाल्यानंतर, आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी पुष्टी केली आहे की, Vodafone Idea (Vi) लवकरच 5G रोलआउट सुरू करेल. कंपनीने 5G रोलआउटची तयारी पूर्ण केली आहे आणि लवकरच वापरकर्त्यांना हाय-स्पीड इंटरनेट सेवांचा लाभ मिळेल. तथापि, कंपनीने कोणत्याही रोलआउट टाइमलाइन किंवा Jio किंवा Airtel सारख्या 5G लॉन्च तारीख जाहीर केलेली नाही.
बीएसएनएल
सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने अद्याप 4G रोलआउट प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. तथापि, संचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे की BSNL वापरकर्त्यांसाठी 5G रोलआउट पुढील वर्षी १५ ऑगस्टपासून सुरू होईल.
When your telecom Company will Give 5G Service
Mobile Technology Idea BSNL Reliance Jio Airtel Vodafone