विशेष प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्रात सोमवापासून (7 जून) कोरोना निर्बंध शिथिल होणार आहेत. त्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. याअंतर्गत नाशिक शहर व जिल्हा अनलॉक कधी होणार? याचा खुलासा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की
शासनाकडून प्राप्त झालेल्या अधिसूचनेमध्ये जिल्हा व महानगरपालिका असे घटक करून त्यांच्यासाठी पाच लेवल्स निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट व एकूण वापरात असलेले ऑक्सिजन बेड्स याचे प्रमाण विचारात घेऊन आपण कोणत्या लेवलमध्ये बसतो ते निश्चित करायचे आहे. त्यानंतर त्या लेवल साठी निश्चित केलेले नियम लागू होतील. त्यामध्ये सुद्धा स्थानिक परिस्थिती पाहून अंशतः फेरबदल करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आहेत.
महापालिका व जिल्हा अशी पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेड वापरा बाबतची स्वतंत्र माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
काही असले तरी हे सर्व नियम सोमवारपासूनच लागू होणार असल्याने सध्यातरी पूर्वीच्याच नियमाप्रमाणे वीकेंड लॉक डाऊन सुरू राहील.