विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने संपूर्ण क्रिकेटच्या नियोजित वेळेत आयोजित केले जाऊ शकतात, असे बीसीसीआयने सूचित केले आहे. परंतु मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली स्पष्ट केले आहे की, यापुढे या स्पर्धेचे भारतात आयोजन करण्यास आशावादी नाहीत.
कोविड -१९ साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे बीसीसीआयने ४ मे पासून लीग सामने मध्येच स्थगित केले आहेत. आतापर्यंत या लीगमध्ये २९ सामने खेळले गेले असून आता सर्व संघातील खेळाडूंना सुखरुप त्यांच्या घरी पाठविण्यात आले आहे.
याबाबत माहिती देताना सौरव गांगुली म्हणाले की, आयपीएलचे उर्वरित लीग सामने भारतात खेळणे कठीण होईल कारण भारतात कोविड -१९ साथीमुळे वातावरण खूपच प्रतिकुल आहे आणि गेल्या काही दिवसांपासून दररोज चार लाखांहून अधिक लोक पॉझेटिव्ह असल्याचे दिसून येत आहे. आता पुढील परिस्थितीनुसार टी -२० विश्वचषक भारत बाहेर खेळल्यास आयपीएल सामने युके किंवा युएईमध्ये होऊ शकतील.
गांगुली पुढे म्हणाले की, आता तीन एकदिवसीय मालिका आणि पाच टी -२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारताला श्रीलंकेत जावे लागेल. सध्या आपल्या देशात क्रिकेट मालिका आयोजित करण्यात बरीच अडचण येत आहे. ज्यात १४ दिवसांच्या विलगीकरण अवधीचा देखील समावेश आहे.
आयपीएलचे उर्वरित सामने इंग्लंड मालिकेच्या आधी किंवा नंतर खेळले जातील का? आयपीएल पूर्ण करण्यासाठी वेळ कसा मिळू शकेल का? याविषयी आताच काहीही सांगणे फार घाईचे होईल, असे गांगुली यांनी स्पष्ट केले.