मुंबई – आपल्या देशाची राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई या दरम्यान होत असलेला दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे येत्या दोन वर्षात म्हणजेच २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे. हा महामार्ग पूर्णपणे तयार झाल्यानंतर पेट्रोल डिझेलचा वापर कमी होऊन कार्बन उत्सर्जन कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावेल. कारण इतका कार्बन डाय ऑक्साईड ऑक्सिजनमध्ये रूपांतरित करण्यासाठी, ४० दशलक्षाहून अधिक झाडांची आवश्यकता असेल.
रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या मते, ही एक्सप्रेस दिल्ली आणि मुंबई दरम्यानचे अंतर १२ तासात पूर्ण करेल, सध्या त्यासाठी २४ तास लागतात. एक्स्प्रेस मार्च २०२३ पर्यंत कार्यान्वित केली जाईल. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी होऊन परकीय चलन वाचवण्यास मदत होईल.
मंत्रालयाच्या अंदाजानुसार, या एक्स्प्रेस वे मुळे दरवर्षी ३२ कोटी लिटर इंधनाची बचत होईल. कारण इतके इंधन वापरल्याने वातावरणात ८५० दशलक्ष किलोग्राम कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन रोखण्यात यशस्वी मदत होईल. वातावरणातून कार्बन डाय ऑक्साईड कमी करण्याबरोबरच ४० लाख वृक्षांची बरोबरी साधली जाईल. तसेच एक्सप्रेस वेच्या बाजूने २० लाख झाडे लावण्यात येणार असून हवेची गुणवत्ता आणखी सुधारेल.
संपूर्ण एक्स्प्रेसची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की त्याचा पर्यावरण आणि वन्यजीवांवर कमी परिणाम होईल. हा आशियातील पहिला आणि जगातील दुसरा असा एक्सप्रेस वे असेल, ज्याद्वारे वाटेत वन्य प्राण्यांची योग्य हालचाल करण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी एकूण पाच ठिकाणी पूल बांधण्यात येणार आहे. जंगलातील संपूर्ण इको-सेन्सिटीव्ह झोनमध्ये चार किलोमीटर लांब आठ लेन बोगदा देखील तयार केला जाईल, त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही.