मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

खुद्द पंतप्रधानांचे स्वप्न असलेली बुलेट ट्रेन भारतात नक्की धावेल? अशी आहे या प्रकल्पाची सद्यस्थिती

by Gautam Sancheti
एप्रिल 14, 2022 | 5:12 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
bullete train

 

मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
भारत अत्यंत वेगाने प्रगतीकडे वाटचाल करत असून बुलेट ट्रेन हा या वाटचालीतील मैलाचा दगड ठरणार आहे. बुलेट ट्रेनचे भारताचे स्वप्न लवकरच साकार होण्याच्या मार्गावर आहे. जपानची हाय-स्पीड ट्रेन बुलेट भारतीय परिस्थितीशी जुळवून घेत आहे. भारतातील तापमान, धूळ आणि वजनानुसार बुलेट ट्रेनमध्ये बदल करण्यात येत आहेत. बुलेट ट्रेन व्हावी अशी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. २०१४ साली सत्तेत येताच त्यांनी बुलेट ट्रेनची घोषणा केली होती. या प्रकल्पाची सद्यस्थिती नेमकी काय आहे हे आपण आता जाणून घेऊया…

रेल्वेमंत्र्यांना दररोज अहवाल
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्निहोत्री यांनी सांगितले की, बुलेट ट्रेनची पहिली चाचणी 2026 पर्यंत गुजरातच्या सुरत-बिलीमोरा सेक्शनवर सुरू केली जाईल. देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणार आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यान एकूण 502 किमी लांबीचा हायस्पीड कॉरिडॉर तयार करण्यात येत असल्याची माहिती अग्निहोत्री यांनी दिली. यापैकी 352 किमीचा ट्रॅक गुजरात राज्यात टाकायचा आहे. त्यासाठी 98.7 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे.
सुरत-नवसारी सेक्शनवरील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीच्या कामाची पाहणी केल्यानंतर सतीश अग्निहोत्री यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्राधान्याने केले जात आहे. यावेळी जपानचे राजदूत सातोशी सिझुकीही उपस्थित होते. प्रकल्पाच्या कामाचा प्रगती अहवाल दररोज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठवला जातो. अग्निहोत्री यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात असा दावा केला की, सुरत-बिलीमोरा (48 किमी) सेक्शनवर बुलेट ट्रेनची चाचणी डिसेंबर 2026 मध्ये सुरू होईल.

अग्निहोत्री म्हणाले की, बुलेट ट्रेन प्रकल्पात सध्या २० हजार कामगार व कर्मचारी काम करत आहेत. लवकरच या प्रकल्पात एक लाख लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. ते म्हणाले की, मेक इन इंडिया अंतर्गत सर्व प्रकल्प भारतीय कंपन्यांना देण्यात आले आहेत. नर्मदा पूल, माही पूल, ताप्ती पूल आणि साबरमती पुलावर विहिरींच्या पायाभरणीचे काम सुरू आहे. याशिवाय वापी-साबरमतीपर्यंतच्या आठही बुलेट ट्रेन स्थानकांवर विविध टप्प्यांत बांधकाम सुरू आहे.
सतीश अग्निहोत्री म्हणाले की, जपानच्या तांत्रिक, रोलिंग स्टॉक आणि सिग्नल यंत्रणेमुळे बुलेट ट्रेनला कधीही अपघात होणार नाही. या तंत्राला Crash Avoidance System म्हणतात.

असा आहे मुंबई-अहमदाबाद हायस्पीड बुलेट रेल्वे प्रकल्प
– कॉरिडॉरची एकूण लांबी 508.17 किमी
– कमाल वेग ताशी 320 किलोमीटर
– मुंबईहून अहमदाबादला पोहोचण्यासाठी 2.07 तास लागतील (काही थांब्यांसह)
– सर्व थांब्यांसह 2.58 तास लागतील
– एकूण स्थानकांची संख्या – 12 (गुजरातमध्ये – 8, महाराष्ट्रात – 4)
– स्थानकेः वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद/नडियाद, अहमदाबाद आणि साबरमती, मुंबई (BKC), ठाणे, विरार आणि बोईसर
– गुजरातमधील सुरत आणि साबरमती येथे 03 डेपो, तर मुंबईत ठाण्यात एक डेपो बांधण्यात येणार

भूसंपादन व बांधकाम
– दादरा नगर हवेलीत 100 टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे.
– महाराष्ट्रात ६८.७ टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे (खासगी-८७ टक्के, सरकारी-९२ टक्के)
– वापी ते साबरमतीपर्यंतच्या सर्व 8 स्थानकांचे बांधकाम सुरू झाले आहे
– सुरत डेपोच्या 128 पायांपैकी 118 पाया पूर्ण झाले आहेत.
– HSR, मेट्रो, BRT आणि दोन भारतीय रेल्वे स्थानके एकत्रित करून साबरमती येथील पॅसेंजर टर्मिनल हबचे बांधकाम ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अभिनेत्री झीनत अमानचा खुलासा, ‘पतीच्या मृत्यूनंतर सासरच्यांनी शेवटचे दर्शनही घेऊ दिले नाही’!

Next Post

राज्यात महिला सुरक्षेसाठी येत्या १ मे पासून हा अभिनव प्रकल्प; राज्य सरकारची घोषणा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

SUPRIME COURT 1
संमिश्र वार्ता

धर्मांतरविरोधी कायद्यांना स्थगिती देण्यासाठी दाखल याचिकांवर सुनावणी…सर्वोच्च न्यायालायने दिले हे निर्देश

सप्टेंबर 16, 2025
G04fkJmWIAATyZA e1758000093714
संमिश्र वार्ता

अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती…अमोल मिटकरींनी डिवचलं तर रोहित पवारांनी केले कौतुक

सप्टेंबर 16, 2025
cbi
भविष्य दर्पण

सीबीआयने या माजी मंत्र्यांच्या बहिणी, मेहुण्या, पीएच्या जागेवर १६ ठिकाणी टाकले छापे…मिळाले हे घबाड

सप्टेंबर 16, 2025
income
संमिश्र वार्ता

ITR- प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यास मुदतवाढ…इन्कम टॅक्स भरणा-यांना दिलासा

सप्टेंबर 16, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

रेल्वेच्या ऑनलाइन आरक्षित तिकीट बुक करण्याच्या नियमात १ ऑक्टोबरपासून होणार बदल

सप्टेंबर 16, 2025
Untitled 22
संमिश्र वार्ता

नाशिकहून एअरलिफ्ट करण्यासाठी हॅलिकॉप्टर…बीडमध्ये बचाव कार्याला गती

सप्टेंबर 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची भाडे आकारणी बंधनकारक…बघा, शासनाचा निर्णय

सप्टेंबर 16, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आर्थिक स्थिती आनंद देईल, जाणून घ्या,मंगळवार, १६ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 16, 2025
Next Post
140x570 1

राज्यात महिला सुरक्षेसाठी येत्या १ मे पासून हा अभिनव प्रकल्प; राज्य सरकारची घोषणा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011