विशेष प्रतिनिधी, पुणे
व्हॉट्सएप वापरताना आपण उत्साहात असतो. खासगी सुरक्षेचा फारसा विचार करीत नाही. मात्र काही गोष्टींची काळजी नक्कीच घ्यायला हवी. यातून ना केवळ तुमचे नुकसान होण्यापासून वाचते, तर तुमचा डेटाही सुरक्षित राहतो. नेहमी आपण बघतो की व्हॉट्सएप युझर्सकडून काही कॉमन सुचा होतात. त्यातून मोठे नुकसानही भोगावे लागते. अश्यात या चुका पुन्हा होऊ नये याची काळजी घ्यावी लागले. या चुका नेमक्या कोणत्या आहेत, हे जाणून घेऊया…
अनोळखी नंबर्स सेव्ह करू नका
बरेचदा आपण कॅबवाला, डिलीव्हरी बॉय किंवा एखाद्या सर्व्हिसवाल्यालाचा नंबर सेव्ह करतो आणि नंतर डिलीट करायला विसरून जातो. अश्यात व्हॉट्सएपवर ही अनोळखी व्यक्ती आपला प्रोफाईल पिक्चर तर बघतेच शिवाय स्टेटसही बघत राहते. त्याच्यापर्यंत आपली संपूर्ण माहिती पोहोचत असते. त्यामुळे अनोळखी लोकांचे नंबर्स सेव्ह करू नका.
टू स्टेप व्हेरिफिकेशन
हे व्हॉट्सएपचे अत्यंत महत्त्वाचे फिचर आहे. टू-स्टेप व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला ६ अंकांचा पीन सेट करावा लागतो. कोणत्याही नव्या डिव्हाईसमध्ये व्हॉट्सएप सुरू करण्यासाठी हा पीन आवश्यक असेल. हा पीन मध्येच केव्हाही विचारला जाऊ शकतो. सायबर फ्रॉड टाळण्यासाठी हा पीन उपयुक्त आहे.
मेसेज फॉरवर्ड करताना…
व्हॉट्सएपवर आपल्याकडे अनेक मेसेजेस येतात. ते फॉरवर्ड करताना आपण विचार करायला हवा. फेक न्यूज तर नाही, याची खात्री करून घ्यायला हवी. सरकारी नोकऱ्यांच्या नावावर अनेक बोगस लिंक्स असतात. त्या देखील फॉरवर्ड करू नये. तसेच धर्म किंवा समाजाच्या विरोधातील संदेश फॉरवर्ड करण्यापासून नक्कीच वाचले पाहिजे.