इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगातली कितीही श्रीमंत व्यक्ती असो, त्याच्या व्यवसायात चढ उतार हे येतच असतात. कारण व्यवसाय म्हटला म्हणजे, नफा – तोटा आलाच काही वेळा प्रचंड नफा होतो, तेव्हा एखादी कंपनी चांगलीच प्रसिद्ध होते. मात्र काही वेळा अशा कंपनीला तोटा देखील सहन करावा लागतो. सध्या एका जगप्रसिद्ध कंपनीबाबत असेच सुरू आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने आपल्या कंपनीचं नाव बदलून मेटा असे केले होते.
फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप ही सगळी या कंपनीच्या परिवारातली सोशल मीडिया अॅप्स आहेत, मात्र या परिवारातील व्हॉट्सअॅप आता विकले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मेटा कंपनीच्या महसुलात झालेली घट कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. सन 2022च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात घट झाली असून, मेटा कंपनीच्या महसुलात घट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचा परिणाम भविष्यात व्हॉट्सअॅपवरही होऊ शकतो. कमी नफा देणाऱ्या व्हॉट्सअॅपची विक्री कंपनी करू शकते, असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
या रिपोर्टनुसार, मेटाच्या एकूण महसुलात 1 टक्का घट झाली आहे. यामुळे आता मेटाचा महसूल 28.8 बिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 23 हजार अब्ज रुपये इतका झाला आहे. तिसऱ्या तिमाहीतही यात घट होऊ शकते, असा कंपनीचा अंदाज आहे. तसं झाल्यास महसूल 20 हजार अब्ज रुपयांपर्यंत येईल, असे कंपनीला वाटते. तसेच मेटाचा एकूण नफाही 36 टक्क्यांनी कमी होऊन 6.7 बिलियन डॉलर झाला आहे. फेसबुकचं मेटाव्हर्सबाबत एक मोठे नियोजन आहे. यावर आधीच कंपनीनं अब्जावधी डॉलर गुंतवणूक केली आहे.
विशेष म्हणजे Reality Labs हा मेटाचा एक विभाग झुकेरबर्गच्या मेटाव्हर्स ड्रीमवर काम करतो आहे. या विभागातही गेल्या तिमाहीत 2.8 बिलियन डॉलर्सची घट नोंदवली गेली आहे. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, कंपनीनं व्हॉट्सअॅपवर सगळ्यात जास्त गुंतवणूक केली होती; पण कंपनीला त्याचा फारसा फायदा होत नाहीये. झुकेरबर्गसमोर सध्या अनेक आव्हानं आहेत. इन्स्टाग्रामला टिकटॉकसारखं बनवून युझर्सना एंगेज ठेवायचं आहे.
त्यातच टीनएजर्स आधीसारखे आता फेसबुकवर अॅक्टिव्ह नसतात, असं डेटा सांगतो. यामुळे कंपनीची वाढ कमी झाली आहे. फेसबुकच्या माध्यमातून युझर्सना टार्गेट करणाऱ्या जाहिरातदारांना अॅपल ब्लॉक करत आहे. ४ ) व्हॉट्सअॅप हे लोकप्रिय असलं, तरी इन्स्टाग्रामसारखे पैसे मिळवून देऊ शकत नाहीये. या सगळ्या गोष्टींमुळे कंपनीचा महसूल घटला आहे.व्हॉट्सअॅपचा महसूल खूप कमी असल्यामुळे त्याचा आयपीओ काढला जाऊ शकतो. एखादी प्रायव्हेट इक्विटी कन्सॉर्शियम किंवा मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीला व्हॉट्सअॅपची विक्री केली जाऊ शकते. मायक्रोसॉफ्टने व्हॉट्सअॅप खरेदी करण्यात आधी रस दाखवला होता.
झुकेरबर्गने इन्स्टाग्राम कंपनी 2012 मध्ये एक बिलियन डॉलर्समध्ये खरेदी केली होती. 2019मध्ये इन्स्टाने कंपनीला 20 बिलियन डॉलर्सचा नफा मिळवून दिला. 2014 मध्ये कंपनीनं व्हॉट्सअॅप 19 बिलियन डॉलर्सना खरेदी केलं. इन्स्टाएवढी कमाई व्हॉट्सअॅपमुळे अद्याप झालेली नाही. त्यामुळेच व्हॉट्सअॅप विकलं जाऊ शकतं. अर्थात अजून कंपनीनं याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही; मात्र कंपनीला असाच तोटा होत राहिला, तर लवकरच व्हॉट्सअॅप विकलं जाऊ शकेल.
झुकरबर्गला इन्स्टाग्रामवर नागरिकांना खिळवून ठेवायचे आहे. यासाठी इन्स्टाला ते TikTok सारखे बनविण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतू फेसबुकला महिला आणि तरुणांनी, अल्पवयीनांनी काहीशी नापसंती देण्यास सुरुवात केली आहे. ते फेसबुकवर जास्त सक्रीय नसतात. यामुळे कंपनीच्या वाढीवर परिणाम झाला आहे. याशिवाय अॅपल कंपनीने देखील फेसबुकविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. फेसबुक अॅपद्वारे युजरला टार्गेट करणाऱ्या जाहिरातदारांना अॅपल ब्लॉक करू लागली आहे. याचा मोठा परिणाम फेसबुकच्या रिव्हेन्यूवर झाला आहे.
एक वेळ अशी होती की, जगातील टॉप-३ श्रीमंत व्यक्तींच्या यादीत फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गचा समावेश असायचा. पण सध्या झुकरबर्गचे वाईट दिवस सुरू आहेत. यंदाच्या वर्षात झुकरबर्गच्या नेटवर्थमध्ये तब्बल निम्म्याहून अधिक घसरण झाली आहे. आता झुकरबर्ग सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १७ व्या क्रमांकावर गेला आहे. यातच त्यानं सॅन फ्रान्सिस्कोमधील आपलं घर ३.१ कोटी डॉलरला म्हणजे जवळपास २.४७ अब्ज रुपये विकल आहे. यंदाच्या वर्षातील शहरातील सर्वाधिक किमतीला विकलं गेलेलं घर ठरलं आहे. झुकरबर्गनं नोव्हेंबर २०१२ मध्ये हे घर १ कोटी डॉलरला खरेदी केलं होतं.
आणखी एक कारण म्हणजे मेटा कंपनीला आता टिकटॉक आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मकडून कडवी टक्कर मिळत आहे. युझर्स आता टिकटॉक आणि यूट्यूबकडे वळत आहेत. त्यामुळे कंपनीच्या मिळकतीवर मोठा परिणाम झाला आहे. यंदाच्या वर्षात कंपनीच्या शेअरमध्येही मोठ्या प्रमाणात घसरण झाली. गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत फेसबुककडे २.९१ अब्ज मासिक अॅक्टीव्ह युझर्स होते. त्याआधीच्या तीन महिन्यांच्या आकडेवारीशी तुलना केल्यास काहीच फरक पाहायला मिळालेला नाही.
Whatsapp will sale likely Mark Zuckerberg Meta