मुंबई – व्हॉट्सअॅपच्या उत्तम फिचर्सपैकी एक व्हॉट्सअॅप स्टिकर ओळखले जातात. या स्टिकर्सना सोप्या पद्धतीने गुगल स्टोअरवरून डाउनलोड करता येऊ शकतात. परंतु व्हॉट्सअॅपच्या प्लॅटफॉर्मवर फोटोवरून स्टिकरमध्ये रूपांतरित करणारे फिचर अद्याप आलेले नाहीये. जर तुम्ही स्वतःच्या फोटोचे व्हॉट्सअॅप स्टिकर मित्र किंवा कुटुंबीयांना पाठवू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला एक विशेष ट्रिक सांगणार आहोत. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही आपले आवडते फोटोचे स्टिकर बनवू शकताल. तर चला… पूर्ण पद्धत माहिती करून घेऊयात.
फोटोचे स्टिकर असे बनवावेत
स्वतःचे व्हॉट्सअॅप स्टिकर बनविण्यासाठी सर्वात पहिले व्हॉट्सअॅप स्टिकर अॅप ओपन करावे. त्यात तुमच्या स्क्रिनवर क्रिएट न्यू स्टिकर पॅकचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून स्टिकर पॅकला नाव द्यावे. त्यावर स्टिकर पॅकचे फोल्डर बनेल. त्यावर क्लिक करा. तिथे तुम्हाला मोठ्या प्रमाणात बॉक्स दिसतील. त्यापैकी कोणत्याही एकावर क्लिक करा. आता ओपन गॅलरी पर्यायावर क्लिक करून कोणत्याही एका फोटोवर टॅप करा. तुमच्या आवडत्या फोटोचे स्टिकर तयार होईल. या स्टिकरला तुमचे मित्र आणि कुटुंबीयांना शेअर करू शकतात.
आयओएस बिटा युजर्ससाठी फिचर
व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी आयओएस बिटा युजर्ससाठी डिसअॅपिअरिंग मेसेज फिचरला व्ह्यू वन्स नावाने कार्यान्वित केले होते. हे फिचर अॅक्टिव्ह झाल्यावर शेअर करण्यात आलेले फोटो आणि व्हिडिओ आपोआप गायब होतात. वेब बिटा इन्फोच्या अहवालानुसार, डिसअॅपिअरिंग मेसेज फिचर सक्रिय झाल्यावर पाठविलेला मेसेज युजरच्या फोनसह रिसिव्हरच्या डिव्हाइसमधूनही आपोआप डिलिट होणार आहे. त्यासोबतच युजर्स मेसेज इन्फो पर्यायावर जाऊन मेसेज केव्हा डिलिव्हर करण्यात आला आणि केव्हा पाहण्यात आला यासारखी माहितीही मिळणार आहे.