मुंबई – सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जास्तीत जास्त लोकाभिमुख व्हावा यासाठी व्हॉट्सअॅपतर्फे विविध फिचर्स आणि तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. विविध सेवा सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न सर्व प्लॅटफॉर्मवर होत आहे. यात व्हॉट्सअॅपही मागे नाही. व्हॉट्सअॅपच्या चॅटमधून दुसर्या कॉन्टॅक्टला पैसे पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्हॉट्सअॅप वेगवेगळ्या ऑफरही देत आहे.
गेल्या महिन्यात व्हॉट्सअॅपतर्फे यूपीआय आधारावरील पेमेंट सेवेअंतर्गत कॅशबॅक देण्यास सुरुवात करण्यात आली. आता व्हॉट्सअॅपतर्फे बिटा युजर्ससाठी फिचर कार्यान्वित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, असे बिझनेस इनसाइडरच्या वृत्तात म्हटले आहे. वेगवेगळ्या कॉन्टॅक्ट्सना पैसे पाठवल्यावर ५१ रुपयांची कॅशबॅकची हमी देण्यात आली आहे. पाच वेळा पेमेंट केल्यानंतर युजर्स ५१ रुपयांचे कॅशबॅकचा लाभ घेऊ शकणार आहेत. म्हणजेच युजर्सना २५५ रुपयांचा फायदा होणार आहे.
हा पर्याय कुठे मिळणार
बिटा अॅप युजर्ससाठीच हे फिचर कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे सामान्य युजर्सना हे फिचर दिसणार नाही. हे फिचर चॅट लिस्टच्या वर एका बॅनर असून ते युजर्सना ऑफरबद्दल माहिती देते. व्हॉट्सअॅप बिटासाठी एनरोल करण्यासाठी गुगल प्ले उघडून व्हॉट्सअॅप सर्च करा. ‘बिटा टेस्टर बना’ या पॅनलपर्यंत खालपर्यंत स्क्रोल करा. ‘I’ m in > Join निवडा. त्यानंतर काही तासातच बिटा युजर झाल्याचे अपडेट मिळेल.
ही ऑफर बिटा युजर्ससाठी उपलब्ध असून, लवकरच सामान्य युजर्सना ती मिळणार आहे. अशा प्रकारे कॅशबॅकसह आपल्या सेवेचा वापर करण्यासाठी व्हॉट्सअॅपकडून युजर्सना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मचे अनावरण केल्यानंतर गुगलतर्फे अशीच एक योजना देण्यात आली होती. ती आज गुगल पे या नावाने ओळखली जाते.
व्हॉट्सअॅपने चॅट बारमध्ये एक पेमेंट बटन जोडले होते. हे बटन युजर्सना थेट चॅट बारमधून पैसे पाठविण्यास सक्षम बनविते. यापूर्वी पेमेंट पाठविण्यासाठी युजर्सना चॅट अॅक्शन शीट उघडावी लागत होती. व्हॉट्सअॅपतर्फे ग्राहकांना पैसे पाठवताना पेमेंट पेजशी जोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.