मुंबई – सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या व्हॉटसअॅपने पेमेंटची सेवा सुरू करुन ग्राहकांना मोठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. पेमेंट सेवा अधिक आकर्षक आणि आनंददायी करण्यासाठी व्हॉट्सअॅपने बॅकग्राउंड फिचर सादर केले आहे. या नव्या फिचरच्या माध्यमातून वाढदिवासाच्या शुभेच्छा देताना नव्या पेमेंट बॅकग्राउंडचा वापर करून विशेष भेट दिल्याचा आनंद देऊ शकतात. अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रकारात नव्या फिचरचे अपडेट देण्यात आले आहे.
व्हॉट्सअॅपचे नवे फिचर कसे काम करते हे पाहण्यासाठी एक उदाहरण घेऊया, रक्षाबंधनानिमित्त पैसे पाठवताना बॅकग्राउंड इमेज म्हणून रक्षाबंधनाची थीम निवडू शकतात. त्याशिवाय व्हॉट्सअॅपने वाढदिवस, पार्टी, सुट्ट्यांसह एकूण ७ बॅकग्राउंड थीम जोडल्या आहेत. त्याचा आवश्यकतेनुसार तुम्ही वापर करू शकतात.
या फिचरचा वापर करताना व्हॉट्सअॅपमध्ये सेंड पेमेंटच्या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर स्क्रिन बॅकग्राउंड आयकॉनवर टॅप करावे आणि पुन्हा पेमेंट बॅकग्राउंड निवडावे. टॅप केल्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारचे पर्याय दिसतील. त्यापैकी एक पर्याय तुम्ही निवडू शकतात. बॅकग्राउंडसोबत तुम्ही एक नोटही लिहू शकतात. पेमेंट झाल्यानंतर ज्याला पेमेंट मिळेल त्याला तुमची पेमेंट थीम दिसेल.
व्हॉट्सअॅप एक नव्या फिचरची टेस्टिंग करत आहे. हे फिचर आल्यानंतर व्हॉट्सअॅप युजर्सच्या प्रोफाइलवर टॅप करून स्टेटस दिसेल. हे फिचर ट्विटरच्या फ्लीट फिचरसारखेच असेल. सध्या स्टेटससाठी वेगळे सेक्शन आहे. नवे फिचर आल्यानंतर आधीचे स्टेटस सेक्शनला हटविले जाऊ शकते.
नव्या फिचरची टेस्टिंग सुरू आहे. अँड्रॉइडच्या बिटा व्हर्जन २.२१.१७.५ वर नवे फिचर देण्यात आले आहे. बिटा टेस्टिंगचा एक स्क्रिनशॉटसुद्धा समोर आला आहे. त्यामध्ये प्रोफाइलवर टॅप करण्याचा पर्याय दिसेल. टॅप करण्यापूर्वी दोन पर्याय मिळतील. त्यामध्ये तुम्हाला स्टेटस पहायचे आहे की प्रोफाइल फोटो हे विचारले जाईल, अशी माहिती WABetaInfo च्या वृत्तात दिली आहे.