विशेष प्रतिनिधी, पुणे
इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp युजर्सना सुविधा देण्यासाठी वेळोवेळी नवे फिचर्स लाँच करते. असेच एक फिचर WhatsApp लवकरच लाँच करणार आहे. या फिचरला
Multi Device Support फिचर या नावाने ओळखले जाणार आहे. WhatsApp अपडेट ट्रॅक करणारे संकेतस्थळ WABetaInfo ने या फिचरबाबत माहिती दिली आहे. नवे फिचर अपडेट केल्यानंतर युजर चार डिव्हाइसमध्ये सिंगल WhatsApp अकाउंट एकत्रित अॅक्टिव्ह ठेवू शकणार आहेत.
लॉग इन-लॉग आउटची समस्या संपुष्टात
Multi Device Support फिचरच्या लाँचिंगच्या आधीपर्यंत सिंगल डिव्हाइसमध्येच एक अकाउंटला अॅक्टिव्हेट ठेवले जाऊ शकत होते. आतापर्यंत व्हॉट्सअॅप अकाउंट एकाच डिव्हाइसमध्ये लॉग इन करू शकत होतो. तुम्ही दुसर्या डिव्हाइसमध्ये व्हॉट्सअॅप अकाउंट लॉग इन केल्यास व्हॉट्सअॅपचे पहिले अकाउंट आपोआप लॉग आउट होत होते. नवे फिचर आल्यानंतर ही समस्या संपुष्टात येईल. युजर्सना सारखे सारखे वेगवेगळ्या डिव्हाइस अकाउंटला लॉग इन आणि लॉग आउट करावे लागणार नाही.
नवे फिचर कसे काम करेल
WhatsApp च्या Multi Device Support फिचरला वेगवेगळ्या डिव्हाइसवर अॅक्टिव्हेट करण्यासाठी आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी पाठविला जाऊ शकतो. ओटीपी व्हेरिफिरेशननंतर कमाल चार डिव्हाइसमध्ये एक सिंगल WhatsApp अकाउंटला एक्सेस करू शकतो.
नव्या फिचरला सपोर्ट
WhatsApp च्या मल्टी डिव्हाइस सपोर्ट फिचरसोबतच कंपनी Disappearing Mode आणि View Once फिचर लाँच करू शकते. Disappearing Mode या फिचरमध्ये मेसेज एका मर्यादित वेळेनंतर आपोआप डिलिट होऊन जाईल. तर View Once फिचर हे डिसअपिअरिंग फिचरसोबत काम करेल. म्हणजेच युजर चॅटमधील फोटो आणि व्हिडिओंना पाहू शकणार आहे. परंतु डाउनलोड करण्याची सुविधा नसेल.