विशेष प्रतिनिधी, पुणे
युजर्सच्या चॅटिंगचे अनुभव आधीपेक्षा आणखी चांगले करण्यासाठी व्हॉट्सअॅपने View Once फिचर कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे फिचर इनेबल करून फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर आपोआप रिसिव्हरच्या चॅटमधून डिलिट होऊन जातात. हे फिचर गेल्यावर्षी लाँच केलेल्या डिसअपियरिंग मेसेजसारखेच आहे. डिसअपिरिंग मेसेज फिचर अॅक्टिव्ह केल्यानंतर सात दिवसांनंतर मेसेज डिलीट होतात. परंतु व्ह्यू वन्स हे फिचर अॅक्टिव्ह केल्यानंतर मेसेज पाहिल्यानंतर लगेच डिलीट होतील.
व्हॉट्सअॅप वेबसाठी नवे फिचर
WABetalnfo च्या वृत्तानुसार, कंपनी या फिचरला व्हॉट्सअॅप वेबसाठी कार्यान्वित करणार आहे. व्ह्यू वन्स फिचरला व्हॉट्सअॅप वेबच्या अपडेट व्हर्जन २.२१२६.११ सह ऑफर केले जात आहे. युजर्सना या फिचरचे बटन वेब क्लायंटवरून मीडिया कंटेट शेअर करताना दिसेल. या फिचरला बॅचमध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहे. आगामी काळात हे फिचर सर्व युजर्सपर्यंत पोहोचणार आहे.
कंपनीकडून अद्याप दुजोरा नाही
व्ह्यू वन्स फिचरला मोबाईल युजर्सच्या कधीपर्यंत पोहोचेल याबाबत अद्याप कंपनीतर्फे कोणतेही अधिकृत निवेदन करण्यात आलेले नाही. गेल्या महिन्यात फिचरला काही अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये स्पॉट करण्यात आले होते. WABetalnfo त्यावेळी सांगितले होते, की व्हॉट्सअॅप या फिचरला २.२१.१४.३ व्हर्जनसोबत बिटा टेस्टर्ससाठी कार्यान्वित करत आहे.
नव्या अर्काइव्ह फिचरचीही एंट्री
व्हॉट्सअॅप वेबसाठी या अपडेटमध्ये कंपनीकडून अर्काइव्हसाठीसुद्धा एक नवे फिचर दिले जात आहे. अर्काइव्ह केलेल्या नव्या चॅटमध्ये नवा मेसेज आल्यावर तो चॅट लिस्टमध्ये वर येणार नाही. त्यामुळे अनावश्यक क्रमांकाना ब्लॉक न करता दुर्लक्षित केले जाऊ शकते. व्हॉट्सअॅपच्या सर्व युजर्सना हे फिचर कार्यान्वित करताही येणार नाही. परंतु त्यामुळे हळूहळू फिचर युजर्सपर्यंत पोहोचणार आहे.