नवी दिल्ली – व्हॉट्सअॅप जगाभरात इतके प्रसिद्ध झाले आहे की, त्याच्याशिवाय आता पान हलू शकत नाही. काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे एकच गोंधळ उडाला होता. काही युजर्सनी या पॉलिसीचा विरोध करत आपले अकाउंटही डिलिट केले होते. काहींनी त्याच्याऐवजी दुसरे अॅप्स डाउनलोड केले होते. तरीही कोट्यवधी युजर्सना अजूनही व्हॉट्सअॅपची भुरळ पडलेली आहे. देशात अजूनही ५० कोटींहून अधिक व्हॉट्सअॅप युजर्स आहेत. तुम्ही व्हॉट्सअॅपचा वापर करत असालच, पण त्याच्याशी संबंधित सर्व आवश्यक गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
व्हॉट्सअॅप उघडल्याशिवाय आणि टाइप केल्याशिवाय तुम्ही मेसेज कसे पाठवू शकता हे तुम्हाला ठाऊक आहे का? जास्त विचार करू नका. असे करणे शक्य आहे. चला तर मग व्हॉट्सअॅप उघडल्याशिवाय आणि टाइपकेल्याशिवाय मेसेज कसा पाठवायचा हे जाणून घेऊयात.
१) सर्वात प्रथम तुमच्या अँड्रॉइड फोनला अनलॉक करून ओके गुगल म्हणा.
२) ओरे गुगल म्हटल्यानंतर गुगल असिस्टंट ओपन होत नसेल तर आधी तुम्हाला सेटअप करण्याची आवश्यकता आहे.
३) त्यासाठी तुमच्या फोन सेटिंगमध्ये जाऊन असिस्टंट सर्च करा.
४) त्यानंतर Launch Google Assistant पर्यायावर जा आणि तो अॅक्टिव्ह करा
५) आता ओके गुगल म्हणून किंवा फोनमध्ये गुगल असिस्टंट बटन दाबून किंवा होम बटन दाबून गुगल असिस्टंट उघडा.
६) त्यानंतर सेंड व्हॉट्सअॅप मेसेज म्हणा.
७) आता कोणत्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे, हे गुगल विचारेल. तुम्हाला ज्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे, त्याच्या नावाचा उच्चार करा.
८) त्यानंतर सेंड म्हणा. तो मेसेज त्वरित संबंधित व्यक्तीला पोहोचेल.