पुणे – व्हॉट्सअॅपने गेल्या वर्षी वापरकर्त्यांसाठी डिसअॅपियरिंग तथा अदृश्य मॅसेज (दिसेनासे संदेश ) सुविधा आणली. या फिचरद्वारे युजर्स आपोआप डिलीट झालेले मेसेज पाठवू शकतात. या मोडसह पाठवलेले संदेश उघडल्यानंतर ते आपोआप हटवले जातात. आता कंपनी या फीचरमध्ये आणखी काही बदल करत असून याला मुदत वाढ मिळणार आहे, म्हणजेच व्हॉट्सअॅपचे मेसेज आता आठवड्याभरात नव्हे तर तीन महिन्यात डिलीट होणार असून या खास सुविधेसाठी एक उत्तम अपडेट लवकर येणार आहे.
नवीन वैशिष्ट्य म्हणजे व्हॉट्सअॅप मेसेज आपोआप डिलीट होण्यासाठी जास्तीत जास्त ७ दिवसांचा वेळ मिळवत असे, पण आता तसे नाही. अदृश्य मॅसेज होणाऱ्या संदेशाची कालमर्यादा ९० दिवसांपर्यंत असू शकते. कंपनी लवकरच या फीचरमध्ये मोठा बदल करण्याची तयारी करत आहे.
आता अदृश्य संदेशांसाठी तीन पर्याय देण्यात येणार असून अपडेट केल्यानंतर, वापरकर्त्यांना गायब मोडमध्ये संदेश पाठवण्यासाठी २४ तास, ७ दिवस आणि ९० दिवस असे तीन मोड मिळू शकतात. वास्तविक त्या करिता गेल्या वर्षी देखील २४ हा तास पर्याय शोधला होता. व्हॉट्सअॅप मेसेज गायब होण्यासाठी १ दिवसाच्या वेळेत काम करत आहे. तथापि, कंपनीने आत्तापर्यंत, कंपनी संदेश अदृश्य होण्यासाठी ७ दिवस मुदत ठेवली होती, ती आता आणखी वाढणार आहे. त्यामुळे मेसेज डिलीट होण्याची भीती फारशी राहणार नाही.