विशेष प्रतिनिधी, मुंबई
Whatapp जगात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅप युजर्सना चांगली सेवा देण्यासाठी नवे नवे फिचर आणत असते. आता Disappearing मेसेज फिचरला अपग्रेड करण्यासाठी कंपनीकडून तयारी सुरू झाल्याची माहिती आहे. अपग्रेडेशननंतर युजर्सचा मेसेज २४ तासानंतर आपोआप डिलिट होणार आहे. सध्या हे फिचर केवळ सात दिवसांसाठी उपलब्ध आहे.
वेब बिटा इन्फोच्या वृत्तानुसार, व्हॉट्सअॅप सध्या आपल्या डिसअॅपिअरिंग मेसेज फिचरवर काम करत आहे. या फिचरमध्ये सात दिवसांसह २४ तासांचा पर्याय जोडला जाणार आहे. हे फिचर अॅक्टिवेट झाल्यानंतर युजर्सचा मेसेज २४ तासांनंतर आपोआप डिलिट होणार आहे. या फिचरचे टेस्टिंग केले जात आहे. अँड्रॉईड आणि आयओएस युजर्ससाठी हे फिचर लवकरच रिलिज केले जाईल.
व्हॉट्सअॅपने गेल्या वर्षी सर्व युजर्ससाठी Disappearing Messages फिचरची घोषणा केली होती. हे फिचर अॅक्टिवेट केल्यानंतर व्हॉट्सअॅपवर पाठविलेले मेसेज, फोटो आणि व्हिडिओ एका आठवड्यानंतर आपोआप डिलिट होतात.
व्हॉट्सअॅपचे नवे फिचर
व्हॉट्सअॅपने मार्च २०२१ मध्ये विशेष फिचर आणले होते. म्यूट व्हिडिओ असे त्याचे नाव आहे. या फिचरच्या माध्यमातून युजर्स व्हिडिओ पाठविण्यापूर्वी त्याचा आवाज म्यूट करू शकणार आहे. म्हणजेच जेव्हा दुसर्याला तो व्हिडिओ मिळाल्यास त्यामध्ये आवाजच नसणार आहे.
म्यूट व्हिडिओचा उपयोग कसा करावा
तुम्हाला ज्या युजरला बिनाआवाजाचा व्हिडिओ पाठवायचा असेल, तर सर्वात प्रथम तुम्ही त्याच्या व्हॉट्सअॅप अकाउंटवर जावे. मेसेज बॉक्सवर क्लिक करून गॅलरीत जावे. जो व्हिडिओ तुम्ही पाठवू इच्छितात त्याला निवडा. तेव्हा तुम्हाला सर्वात वर डाव्या बाजूला स्पिकरला आयकॉन दिसेल. त्यावर टॅप करताच व्हिडिओचा आवाज बंद होईल.