नवी दिल्ली – दिवाळी किंवा सणासुदीच्या काळात बाजारपेठेत खरेदीदारांची गर्दी होते. विविध वस्तूंना मागणी वाढत असते आणि लोक खरेदीचा आनंद घेतात. याच काळात आणखी एक बाजार जोरात चालतो, तो म्हणजे शरीरविक्रयाचा. सध्याच्या समाजमाध्यमाच्या युगात रेड लाईट एरिया ऐवजी असा बाजार आता पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्तपणे सुरू असतो. या सर्वात मुली आणि महिलांचे मात्र शोषण होऊन दलालांचे उखळ पांढरे होते.
दिल्लीतील अशाच एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात तेथील पोलिसांना यश आले आहे. तपासाअंती धक्कादायक खुलासे त्यातून समजले आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावरच असे रॅकेट उघडकीला आल्याने दलालांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. दिल्लीच्या एरोसिटी परिसरातील ही घटना आहे. त्याचं घडलं असं की पोलिसांना खबºयामार्फत हाय प्रोफाईल सेक्सची माहिती मिळाली. त्यानुसार व्हॉटस्अपच्या एका ग्रुपवरून मुली उपलब्ध करून दिल्या जात असत. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला.
दिल्ली पोलिसांपैकी दोन जण बनावट ग्राहक झाले आणि त्यांनी संबंधित ग्रूपवरील दलालांशी संपर्क केला. तिथून त्यांचा दोन मुलींशी संपर्क होऊन त्यांनी एरोसिटी परिसरातील हॉटेलमध्ये त्यांना बोलावले. 20 हजार रूपयांत सौदा ठरला. मात्र पाेिलसांनी त्यांच्या पथकाला तेथे पाचारण केले आणि प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर या मुलींच्या मदतीने संबंधित दलालांनाही पोलिसांनी हॉटेलमध्ये बोलावले. तेव्हा त्यांच्याकडून आणखीनच धक्कादायक माहिती मिळाली. या प्रकरणाचा सूत्रधार वेगळाच असल्याचे त्यातून उघडकीस आले. विशेष म्हणजे हा सूत्रधार देशभरातील दलालांशी व्हॉटस्अप ग्रूपच्या माध्यमातून संपर्कात होता. पोलिसांनी पकडलेल्या दलालांच्या माध्यमातून त्याचाही माग काढला आणि त्याला अटक केली. आता या प्रकरणात दोन युवती, दोन दलाल आणि मुख्य सूत्रधार असे पाच जण ताब्यात घेण्यात आले असून आणखीही काही जण पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी पकडलेल्या पीडित युवती या अनुक्रमे 23 आणि 24 वर्षांच्या आहेत. मुख्य सूत्रधाराचे नाव मोहम्मद जावेद अली असे असून तो दिल्लीतील छत्तरपूर एन्क्लेव येथे राहणारा आहे. जॉन भंडारी आणि रजत गुप्ता अशी दलालांची नावे आहेत, ते अनुक्रमे प्रयागराज आणि आग्रा, उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. आता पोलिस इतर लोकांचा शोध घेत आहेत.