मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मिडियामुळे जग फार जवळ आलं आहे, असं आपण सहज बोलून जातो. पण ते इतकं खरं सिद्ध होत आहे की, एका हवालदाराला त्याच्या पत्नीचं लपून छपून चाललेलं प्रकरण व्हॉट्सएपगृपवरून माहिती पडलं. मुळात सोशल मिडिया हे अत्यंत जपून वापरायचं माध्यम आहे. पण, पत्नीच्याच बाबतीत कुणीतरी चूक केली आणि हवालदारला जोरदार धक्का बसला.
मुंबईतील एका हवालदारानं आपल्या सहकाऱ्याच्या पत्नीसोबत अश्लील चाळे करतानाचा व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल केला. एवढच नाही तर त्याने दोघेही असलेल्या एका कॉमन व्हॉट्सएप गृपवरही तो व्हिडियो शेअर केला. त्यामुळे संबंधित हवालदाराला तर नोकरीवरून तातडीने काढण्यात आलं. पण ज्याच्या पत्नीचा तो व्हडियो आहे, त्या हवालदाराला आता बदनामीला सामोरे जावे लागत आहे. कारण त्या व्हिडियोत त्याचाच सहकारी हवालदार त्याच्या पत्नीसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे. आरोपी अभिजित परब एका व्हॉट्सएपगृपवर आहे, ज्यात सतत अश्लील व्हिडियो पोस्ट केले जायचे. अभिजितने गेल्या महिन्यात त्याच गृपवर एक व्हिडियो पोस्ट केला. या व्हिडियोत तो स्वतःच एका महिलेसोबत अश्लील चाळे करत आहे. आणि ती महिला देखील त्याला प्रतिसाद देत आहे.
धक्काच बसला
व्हिडियो बघितल्यावर गृपमधील सर्व सदस्यांना धक्का बसला. पण त्याहीपेक्षा मोठा धक्का बसला तो महिलेच्या पतीला. कारण महिलेचा पती हा त्याच पोलीस स्टेशनला हवालदार आहे. आणि तो सुद्धा त्या गृपवर आहे.
जाब विचारला
हवालदाराने घरी गेल्यानंतर पत्नीला जाब विचारला. अभिजितविरुद्ध तक्रार दाखल करण्यास सांगितल्यावर तिने नकार दिला. त्यामुळे हवालदाराने दोघांविरुद्धही पोलिसांत तक्रार दाखल केली. एवढच नाही तर त्यानं तिच्या कुटुंबियांना सगळा प्रकार सांगितला आणि माहेरी पाठवून दिले.
बदनामीचं काय?
आरोपीविरुद्ध तक्रार दाखल झाली. पत्नीविरुद्धही तक्रार दाखल करून तिला वेगळं केलं. पण आता हा विषय १२६ लोकांचा समावेश असलेल्या व्हॉट्सएपगृपपुरता मर्यादित राहिला नाही. कारण सोशल मिडिया आणि पोलीस विभागात हवालदाराची खूप बदनामी होत आहे. त्याचं काय करायचं, असा प्रश्न हवालदारापुढे निर्माण झाला आहे.
WhatsApp Group Police got Porn Video of Wife Crime
Mumbai Colleague Cyber