मुंबई – व्हॉट्सअॅपच्या जाळ्यात आता जवळपास संपूर्ण जग आलेले आहे. त्यातील फिचर्स, सिक्युरिटी सिस्टीम वगैरेचीही जगभरात चर्चा होत असते. याशिवाय त्याच्याशी संबंधित प्रत्येक नवी गोष्टी वाऱ्याच्या वेगाने जगभरात पोहोचत असतात. आतापर्यंत तुमचे व्हॉट्सअॅप स्टेटस कुणी कुणी बघितले, हे जाणून घेणे शक्य होते. मात्र आता तुमचा प्रोफाईल फोटो कुणी झूम करून बघितला, हे देखील कळणे शक्य झाले आहे.
व्हॉट्सअॅपवरून व्हिडीओ आणि ऑडीओ कॉल करता येतात. एकमेकांना चॅट करून ते प्रायव्हेट ठेवता येतात. पण व्हॉट्सअॅपवरून एकमेकांवर नजर ठेवण्यासाठी देखील विविध प्लॅटफॉर्म तयार झाले आहेत. त्यात सर्वांत आघाडीवर आहे प्रोफाईल फोटो. आपण सहज कुणाचाही व्हॉट्सअॅप प्रोफाईल फोटो झूम करून बघून घेतो. या फोटोच्या माध्यमातून संबंधित व्यक्ती कुठे फिरायला गेली आहे की आणखी काय करीत आहे, याची माहितीही मिळत असते. अर्थात हा प्रोफाईल फोटो संबंधित व्यक्तीच्या ओळखीसाठी असतो. पण काही लोक वारंवार हा फोटो बदलत असतात. पण आता आपला प्रोफाईल फोटो कोण चोरून बघतो, हे माहिती करून घेणे शक्य आहे. त्यासाठी एक खास ट्रीक आज आपण जाणून घेऊया…
काय करावे.
त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून WhatsApp-Who Viewed Me किंवा Whats Tracker नावाचे अॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यासोबत तुम्हाला 1mobile market सुद्धा डाऊनलोड करावे लागेल. कारण त्याशिवाय WhatsApp-Who Viewed Me डाउनलोड होणार नाही. त्यानंतर या अॅपच्या माध्यमातून गेल्या २४ तासांत ज्यांनी तुमचा डीपी बघितला असेल त्यांची नावे बघता येणार आहे.