मुंबई – आणखी सहज, सोपे आणि लोकाभिमुख होण्यासाठी व्हॉट्सअॅपकडून वेगवेगळ्या फिचरच्या माध्यमातून नवीन प्रयोग केले जातात. मेसेजिंगमधून फाइल शेअरिंग आणि मनी ट्रान्सफर अशा प्रकारच्या अनेक सुविधा व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सना देतो आहे. त्याही एकदम मोफत. तसेच विविध फिचर्सवर व्हॉट्सअॅप काम सुरू आहे. हळूहळू अॅप अपडेट केल्यानंतर ते कार्यान्वित होतील. यामध्ये मल्टी डिव्हाइस, व्हॉट्सअॅप स्टिकर्स, व्हॉट्सअॅप पेमेंट आणि ग्रुपशी संबंधित नव्या फिचर्सचा समावेश आहे.
मनी ट्रान्सफर
व्हॉट्सअॅप मनी ट्रान्सफर सर्व्हिस पेमेंटमध्ये युजर्सना कॅशबॅक देण्यासाठी नव्या ऑफरवर काम करत आहे. WABetalnfo च्या वृत्तानुसार, नव्या फिचरसाठी व्हॉट्सअॅप पेमेंटवरून आर्थिक व्यवहार केल्यास युजर्सना कॅशबॅक मिळणार आहे. नव्या अपडेटमध्ये हे उपलब्ध असेल.
ग्रुप
Whats App लवकरच नव्या अपडेटसह ग्रुप (Whatsapp Group Chat) सेटिंगमध्ये काही नव्या फिचर्सचा समावेश करणार आहे. युजर्सना ग्रुपसाठी आयकॉन बनविण्याची सुविधा देणारे नवे ग्रुप आयकॉन एडिटर फिचर Whats App अँड्रॉइडच्या २.२१.२०.२ बिटा व्हर्जनमध्ये देणार आहे. हे आयकॉन ग्रुप डिस्प्ले इमेज म्हणून वापरले जाऊ शकते. त्याशिवाय WhatsApp आयओएसवर ग्रुप इन्फो पेजसाठी एका नव्या डिझाइनवर काम करत आहे.
मल्टी डिव्हाइस
व्हॉट्सअॅपमध्ये सर्वात वापरल्या जाणार्या आणि आवडणार्या फिचर्सपैकी एक मल्टी डिव्हाइस (Whatsapp Multi Device Feature) फिचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही डिव्हाइससाठी तयार करण्यात आले आहे. परंतु आता फक्त आयओएस डिव्हाइसवरच कार्यान्वित करण्यात आले आहे. एका अकाउंटवर चार डिव्हाइसमध्ये हे फिचर वापरले जाऊ शकते. हे फिचर नव्या २.२१.१८०.१४ अपडेटसह मिळते. लिंक्ड डिव्हाइस सेक्शनच्या माध्यमातून मल्टी डिव्हाइस फिचरला अॅप्लिकेशनमध्ये अॅक्सेस केले जाऊ शकते.
स्टिकर
व्हॉट्सअॅप सध्या अशा एका फिचरवर काम करत आहे जे इमेजला स्टिकरमध्ये बदलून देण्याची व्यवस्था करणार आहे. WhatsApp कथितरित्या आयओएस आणि अँड्रॉइड या दोन्ही युजर्ससाठी फिचर विकसित करत आहे. हे फिचर कार्यान्वित झाल्यानंतर कॅप्शन बारच्या शेजारी एक नवे स्टिकर आयकॉन दिसणार आहेत. हे फिचर वापरले तर पाठवलेली इमेज स्टिकरच्या रूपात दिणार आहे.
प्रायव्हसी
लास्ट सीन, व्हॉट्सअॅप स्टेटस, प्रोफाइल पिक्चर हे फिचर निवडक युजर्सपासून लपविण्यासाठी
व्हॉट्सअॅपकडून आता व्हॉट्सअॅप प्रायव्हसी सेक्शनमध्ये एका नव्या फिचरवर काम करत आहे. आता युजर्सकडे अॅपमध्ये निवडण्यासाठी फक्त तीन पर्याय आहेत. तुम्ही आपले प्रोफाइल पिक्चर, लास्ट सीन आणि स्टेटस पाहण्यास खुले ठेवू शकतात. या सर्व पर्यायांना काही निवडक युजर्सपासून लपविण्यासाठी कोणताच पर्याय नव्हता. आता अशा फिचरवर काम सुरू झाले आहे.