पुणे – आजच्या काळात प्रत्येकाकडेच मोबाईल आहे, परंतु या मोबाईलमध्ये असलेले वेगवेगळे ॲप्स वापरताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. कारण या ॲपच्या माध्यमातून आणि यातून सायबर क्राईम घडू शकतात त्यामुळे आपली फसवणूक होऊन मोठे नुकसान होत शकते, यासाठी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
विशेषतः व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुम्हाला थोडी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. कारण, हॅकर्सनी व्हॉट्सअॅपवर फसवणूक करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. व्हॉट्सअॅप आपले प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित करण्यासाठी स्वत:ला अपडेट करत राहतो, पण सावध राहणे ही मोबाईल अॅप वापरकर्त्यांची जबाबदारी आहे. व्हॉट्सअॅपवर नागरिकांची फसवणूक करण्याचा अनोखा मार्ग सायबर गुन्हेगारांच्या टोळीने शोधला आहे. आता असा गैरप्रकार कसा होतो ते समजून घेऊ या …
हॅलो मॉम किंवा डॅड
‘हॅलो मम’ किंवा ‘हॅलो डॅड’ बोलून घोटाळ्याची सुरुवात अगदी अनौपचारिक पद्धतीने होते. युनायटेड किंगडममधील सायबर गुन्हेगार अशा प्रकारच्या संदेशांसह व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांना लक्ष्य करत आहेत, त्यांना तुमच्या ‘मुलगा’ किंवा ‘मुलीला’ पैसे हवे, असे सांगून पैसे त्वरित हस्तांतरित करण्यास सांगण्यात येतात.
ही विनंती
घोटाळ्याच्या मेसेजिंग मोहिमेमुळे निष्पाप पीडितांना काही महिन्यांत अंदाजे 49,75,683 रुपये गमवावे लागले आहेत. एका माणसाने फसवणूक करणार्यांना सुमारे 2,98,540 पेक्षा जास्त पैसे दिले. कारण, त्याने विचार केला की, त्याला त्याच्या मुलाकडून मदत मागणारा संदेश आला आहे. पाठवलेला संदेश “हॅलो मम” किंवा “हॅलो डॅड” ने सुरू होतो, त्यानंतर त्यांना त्वरित पैसे हस्तांतरित करण्यास सांगितले जाते.
भारतातही फसवणूक
परदेशाप्रमाणे भारतातही फसवणूक समोर येत आहे. केवळ यूकेशी संबंधित नाही तर सायबर फसवणुकीचा हा प्रकार भारतातही सर्रास होत आहे. येथील सायबर घोटाळेबाज हे भोळ्या नागरिकांची फसवणूक करण्यासाठी मॅसेजला (संदेशवाहकांना) प्राधान्य देतात.
असा घडतो गैरप्रकार
हॅकर्स तुमच्या चॅट बॉक्सवर एक ओळखीची व्यक्ती म्हणून पॉपअप संदेश पाठवतात. तो तुमचा भाऊ, बहीण, चुलत भाऊ, मित्र किंवा नातेवाईक असू शकतो आणि लगेच पैशाची मदत मागू शकतो. हे सत्य असल्याचे मानून, काही जण त्वरित पैसे हस्तांतरित करतात आणि काही सेकंदात त्यांचे कष्टाचे पैसे गमावतात.
सतर्क रहा
व्हॉट्सअॅप आणि मेसेंजरच्या वाचकांनी आणि अॅप वापरकर्त्यांनी सावध राहून त्यांचा खरा मुलगा किंवा मुलगी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीची चौकशी करावी, त्याला किंवा तिला खरोखर पैशांची गरज आहे की नाही हे बघावे, अन्यथा ते कोणत्या ना कोणत्या सायबर सापळ्यात गुंतले जात आहेत. तेव्हा सर्वांनी काळजी घ्या बरं !