मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

व्हॉटसअॅपवर तुम्हालाही या नंबरवरुन कॉल येतोय? मग हे वाचाच

by India Darpan
ऑगस्ट 8, 2022 | 5:21 am
in राष्ट्रीय
0
whatsapp e1657380879854

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या काही वर्षात सायबर गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, सायबर क्राईम साठी अनेक कायदे करण्यात आले असून सायबर पोलीस देखील या संदर्भात काळजी घेतात. तरीही सायबर गुन्हेगारी कमी होताना दिसून येत नाही. याकरिता मोबाईल युजर्स आणि सोशल मीडियावर असलेल्या नागरिकांनी स्वतःच काळजी घेणे आवश्यक आहे. सायबर गुन्हेगार ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब असतात.

अनेक भामटे व घोटाळेबाज देखील बिनदिक्कतपणे व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. त्यामाध्यमातून फसवणूकही करतात. पाकिस्तानी नंबरवरून कॉल किंवा मेसेज करणं ही सर्वात जुनी आणि चोरट्यांमधली लोकप्रिय पद्धत आहे. हे सायबर चोरटे Whatsapp युजर्सना मेसेज पाठवतात की युजरला 25 लाखांची लॉटरी लागली आहे. त्याचप्रमाणे 25 लाख रुपयांची लॉटरी जिंकण्यासाठी +92 3208550775 या क्रमांकावरून एका वापरकर्त्याला व्हॉट्सअ‍ॅप संदेश पाठवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे हे ठग वापरकर्त्यांना फसवण्यासाठी ऑडिओ मेसेजमध्ये सांगतात की व्हॉट्सअ‍ॅप लॉटरी जिंकल्याचा मेसेज पाठवला आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत असा लोभ टाळावा आणि येथे नमूद केलेली पावले म्हणजे टीप्स वापरा. तसेच खालील माहिती जाणून घ्या. यामुळे धोक्यापासून म्हणजेच फसवणुकीपासून वाचू शकाल. ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना आमिष दाखवण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी, अभिनेते अमिताभ बच्चन आणि लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती यांच्या नावांचाही पोस्टरमध्ये वापर करण्यात आला आहे.

इतकेच नव्हे त्याचबरोबर विजयी लॉटरीची 25 लाख रुपयांची रक्कम बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी 7098043909 या क्रमांकावर कॉल करण्याचे सांगण्यात आले आहे. ऑडिओ मेसेजमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की या नंबरवर कोणताही सामान्य कॉल नाही, फक्त व्हॉट्सअ‍ॅप कॉल करावे लागतील. तसेच 25 लाखांची लॉटरी तसेच इतर लोभी व्हॉट्सअ‍ॅप संदेशांना बळी पडू नये. घोटाळेबाजांना या युक्त्यांमधून बँक तपशील आणि वापरकर्त्यांची इतर महत्त्वाची माहिती मिळते.

अनेक वेळा वापरकर्ते त्यांच्या फसवणुकीला बळी पडतात आणि त्यांचे मोठे नुकसान करतात. तुम्हालाही असे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज किंवा कॉल येत असतील तर ते टाळण्यासाठी हे उपाय करा. कोणत्याही लॉटरी किंवा पैशाचे आमिष दाखवणारे संदेश किंवा कॉलकडे दुर्लक्ष करा. अनोळखी नंबरवरून येणारे मेसेज किंवा कॉल्सपासून सावध रहा. एखादा नंबर संशयास्पद वाटल्यास, तो ताबडतोब ब्लॉक करा. अशा नंबरची तक्रार करण्याची सुविधाही व्हॉट्सअ‍ॅपने दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर अशा नंबरची तक्रार करू शकता. बिगर भारतीय नंबरवरून येणारे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वगैरे उघडू नका. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. कधीही कोणाशीही OTP शेअर करू नका. त्याचप्रमाणे असे मेसेज अजिबात फॉरवर्ड करू नका. कोणतीही सायबर फसवणूक झाल्यास, सायबर क्राईम पोर्टलवर त्वरित तक्रार करा. कोणत्याही लॉटरी किंवा पैशाचे आमिष दाखवणारे संदेश किंवा कॉलकडे दुर्लक्ष करा. अनोळखी नंबरवरून येणारे मेसेज किंवा कॉल्सपासून सावध रहा. वरील माहितीमुळे तुमची फसवणूक टळू शकेल, त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.

WhatsApp Call from This number Read This
Cyber Crime Lottery Fake Calls Cheating Fraud

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खरंच घराणेशाही संपतेय का? नड्डा खरं बोलले का? भाजप ‘परिवार पार्टी’शिवाय आहे का? जाणून घ्या सत्य..

Next Post

४८ कोटींची खोटी बिले देणे भोवले; मुंबईतील कंपनीच्या मालकाला अटक

Next Post
प्रातिनिधिक फोटो

४८ कोटींची खोटी बिले देणे भोवले; मुंबईतील कंपनीच्या मालकाला अटक

ताज्या बातम्या

farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
Gto2zFia0AUBk3R 1024x910 1 e1750162615934

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण

जून 17, 2025
crime1

वैद्यकीय उपचारासाठी बँकेतून काढलेले ४ लाख ६४ हजार रुपये चोरट्यांनी केले लंपास

जून 17, 2025
Untitled 48

अखेर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये…माजी मंत्री घोलप यांनी सुध्दा घेतला पक्षप्रवेश

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011