नवी दिल्ली – WhatsApp ने युजर्ससाठी एक आनंदवार्ता दिली आहे. कंपनीने अखेर बिटा युजर्स नसलेल्यांसाठी Multi-Device Support फिचर कार्यान्वित करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने आतापर्यंत हे फिचर बिटा युजर्सनाच वापरण्याची परवानगी दिली होती. या फिचरच्या मदतीने एका वेळी अनेक नॉन फोन डिव्हाइस म्हणजेच लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर युजर्स WhatsApp अकाउंट अॅक्सेस करू शकणार आहेत. अपडेटचा व्हर्जन क्रमांक कार्यान्वित WABetalnfo च्या माहितीनुसार, २.२१.१९.९ हा WhatsApp च्या नव्या अपडेट व्हर्जनचा क्रमांक आहे. अँड्रॉइड आणि आयओएसच्या स्टेबल व्हर्जनसाठी हा क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. नव्या व्हर्जनद्वारे अपडेट करून युजर आपल्या फोनमध्ये मल्टी डिव्हाइस सपोर्ट फिचरचा आनंद घेऊ शकतात. व्हॉट्सअॅप भविष्यात येणार्या अपडेट्ससाठी मल्टी डिव्हाइस व्हर्जन अपडेट अनिवार्य होऊ शकतो.
याद्वारेही करू शकणार चॅटिंग
मल्टि डिव्हाइस फिचरला कंपनीने जुलैमध्ये सादर केले होते. याचे वैशिष्ट्य हे आहे की, स्मार्टफोनमध्ये इंटरनेट कनेक्शन उपलब्ध नसले तरी व्हॉट्सअॅप अकाउंटला चार वेगवेगळ्या डिव्हाइसवर आपण अॅक्सेस करू शकणार आहोत. फोन सुरू असताना या फिचरच्या माध्यमातून युजर्स लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर व्हॉट्सअॅप चॅटिंगचा आनंद घेऊ शकणार आहेत.
फिचर असे करावे अॅक्टिवेट
तुमच्याकडे नवे अपडेट आले असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या सोप्या पद्धतीने मल्टी डिव्हाइस बिटाला जॉइन किंवा लिव्ह करू शकतात.
१) सर्वात प्रथम व्हॉट्सअॅप उघडावे
२) सर्वात वरील तीन डॉट असणा-या मेन्यूवर टॅप करावे
३) लिंक्ड डिव्हाइस पर्यायावर जावे
४) आता मल्टी डिव्हाइस बिटा पर्यायावर टॅप करावे
५) येथे तुम्ही बिटा जॉइन किंवा लिव्ह करू शकतात.
आयओएस युजर्ससाठी
१) सर्वात प्रथम व्हॉट्सअॅप उघडावे
२) त्यानंतर सेंटिंग्समध्ये जावे
३) लिंक्ड डिव्हाइसवर टॅप करावे
४) येथे दिलेल्या मल्टी डिव्हाइस बिटा पर्यायावर टॅप करावे
५) आता जॉइन बिटा किंवा लिव्ह बिटावर टॅप करावे