नवी दिल्ली – व्हॉट्सअॅपचा उपयोग सगळ्याच वयाचे लोक करतात. विशेष म्हणजे व्हॉट्सअॅपचा उपयोग आता फक्त मेसेज आणि व्हिडिओ कॉलिंगपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याचा उपयोग व्यवसायासाठीसुद्धा केला जाऊ शकतो. आता रेल्वेच्या संबंधित रिअल टाइम अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मिळू शकतील. त्यासाठी एका नंबरवर मेसेज पाठवावा लागणार आहे. या सेवेला मुंबईतल्या बेस्ट स्टार्टअप कंपनी Railofy नं सुरू केले आहे. याच्या मदतीने रेल्वे प्रवासा दरम्यान तुम्हाला रिअल टाइम अपडेट्स जाणून घेता येतील. तर जाणून घेऊ यात या सेवेचा उपयोग कसा करावा.
एका मेसेजवरून मिळतील रेल्वेचे रिअल टाइम अपडेट्स
मुंबई बेस्ट स्टार्टअप कंपनी Railofy नं प्रवाशांच्या सुविधेसाठी ही सेवा सुरू केली आहे. या सेवेच्या माध्यामातून प्रवाशांना रेल्वे प्रवासाबाबत माहिती, पीएनआर स्टेटसची माहिती मिळू शकणार आहे. तसेच तुमची रेल्वे किती वाजता कुठे पोहोचली आहे आणि किती उशिराने धावत आहे याचेसुद्धा अपडेट्स व्हॉट्सअॅपवर मिळतील.
फक्त एक नंबर सेव्ह करा
रेल्वेचा रिअल टाइम स्टेटस जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त एक नंबर +९१-९८८११९३३२२ सेव्ह करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला त्या नंबरवर १० आकड्यांचा पीएनआर नंबर लिहून पाठवावा लागेल. पीएनआर नंबर पाठवल्यानंतर काही सेकंदात तुम्हाला रेल्वेसंबंधित माहिती उपलब्ध केली जाईल.
सेवेत अनेक खास सुविधा
Railofy च्या या सेवेत तुम्हाला रेल्वेच्या रिअल टाइम अपडेट जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या संबंधित बरीच महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. सोबतच तुम्हाला ही सेवा बंद करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त STOP लिहून पाठवावा लागेल. त्यानंतर सेवा बंद होईल. Railofy अॅप गूगलच्या प्ले स्टोअरवरून मोफत डाउनलोड उपलब्ध आहे.