मुंबई – Whatsapp हल्ली नवनवे फिचर्स येत आहे. जेणेकरून त्यांचा युझर चॅटिंग एक्पीरिअन्समध्ये दुप्पट आनंद घेऊ शकेल. गेल्या काही महिन्यांपासून व्हॉट्सअॅपला आव्हान देणारे अॅप मार्केटमध्ये आल्यामुळे ही परिस्थिती आली, असे मानले जात आहे. एवढेच नव्हे तर मल्टी डिव्हाईस सपोर्टचे फिचर देण्यावरही व्हॉट्सअॅपविचार करीत आहे. त्यानंतर लॉगआऊट न करताही युझर मल्टीपल डिव्हाईसवर व्हॉट्सअॅप वापरू शकणार आहेत. मात्र त्याच्या लॉन्चिंगपूर्वीच मल्टी डिव्हाईस सपोर्टशी संबंधित एक फिचर पुढे आले आहे. त्यामुळे आता पूर्ण सुविधा लवकरच वापरायला मिळणार असा अंदाज व्यक्त होत आहे.
Wabetainfo च्या अहवालानुसार आयओएससाठी व्हॉट्सअॅपचे नवे बिटा व्हर्जन 2.21.30.16 लॉन्च झाले आहे. त्यात लॉग आऊटचे फिचर देण्यात आले आहे. अहवालात असेही म्हटले आहे की हे फिचर मल्टी डिव्हाईस सपोर्टचा भाग असेल व युझर एकाचवेळी वेगवेगळ्या डिव्हाईसवरून आपले व्हॉट्सअॅप अकाऊंट डिलीट करू शकतील. हे फीचर कसे काम करेल, असे सांगणारा एक व्हीडीओ देखील पुढे आला आहे. व्हीडीओनुसार हे फिचर लिंक्ड डिव्हाईस इंटरफेसमध्ये देण्यात आलेल्या डिलीट अकाऊंट अॅाप्शनच्या जागेवर उपलब्ध असेल. मल्टी डिव्हाईस सपोर्ट आल्यानंतर वेगवेगळ्या डिव्हाईसवर व्हॉट्सअॅप वापरता येईल आणि त्याचवेळी कुठल्याही डिव्हाईसवरून अकाऊंट लॉग आऊट करण्याची गरज देखील नसेल. चार स्मार्टफोनवर एकाचवेळी एकच व्हॉट्सअॅप अकाऊंट वापरता येणार आहे आणि त्यासाठी प्रायमरी अकाऊंटमध्ये एक्टीव्ह इंटरनेट कनेक्शनचीही गरज असणार नाही.