नवी दिल्ली ः व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीवरून सध्या अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे. त्यामुळे अनेक युजर्सनी व्हॉट्सअॅप सोडून इतर पर्याय असलेले सिग्नल आणि टेलिग्राम अॅप डाउनलोड करत आहेत. व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीवरून चर्चा सुरू असली तरी इतर अॅपमध्ये नसेलेले अॅडव्हान्स फिचर व्हॉट्सअॅपमध्ये आहेत. व्हॉट्सअॅपमधील अशा पाच फिचरबद्दल आपण माहिती जाणून घेऊ.
पेमेंट फिचर्स
व्हॉट्सअॅप युजर्सच्या सुविधा लक्षात घेता कंपनीनं गेल्या वर्षी व्हॉट्सअॅप पेमेंट फिचरचं लोकार्पण केलं होतं. चॅटिंगसह युजर्स आपल्या कॉन्टॅक्टमधील लोकांना पेमेंट ट्रान्सफर करू शकतात, हे या फिचरचं वैशिष्ट्य आहे. त्यासाठी तुम्हाला आपलं बँक खातं व्हॉट्सअॅपवर अॅड करावं लागेल. त्यानंतर एका क्लिकवर पैसे ट्रान्सफर करू शकतात. हे फिचर टेलिग्राम आणि सिग्नल अॅपवर नाही.
स्टेटस अपडेट
व्हॉट्सअॅपवर युजर्स नेहमी आपलं स्टेटस अपडेट करत असतात. हे फिचर खूपच लोकप्रिय आहे. या फिचरमध्ये युजर्स आपलं स्टेटस २४ तास ठेवू शकतात. २४ तासांनंतर ते बदलू शकतात. तुमचं स्टेटस कोणी कोणी पाहिलं हे सुद्धा आपल्याला कळू शकतं. सिग्नल आणि टेलिग्रामवर हे फिचर नाही.
ग्रुप कॉलिंग
लॉकडाउनदरम्यान व्हिडिओ कॉलिंग आणि ग्रुप कॉलिंग खूपच लोकप्रिय झालं आहे. घरात बसून लोक व्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगच्या माध्यमातून एकमेकांना कनेक्ट झाले. ग्रुप कॉलिंग फिचरमध्ये एकाहून अधिक लोकांशी बोलण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकतात.
पिक्चर इन पिक्चर मोड
व्हॉट्सअॅपमध्ये एक विशेष फिचर पिक्चर इन पिक्चर मोड आहे. व्हॉट्सअॅपशिवाय हे फिचर टेलिग्राममध्ये आहे. पण सिग्नल अॅपमध्ये नाही. मेसेजिंग अॅपमध्ये चॅटसोबत व्हिडिओसुद्धा पाहू शकता, त्याच्यासाठी चॅटमधून बाहेर पडण्याची गरज नाही.
स्टोरेज मॅनेजमेंट
व्हॉट्सअॅपचं स्टोरेज मॅनेजमेंट फिचर खूपच उपयोगी आहे. तुम्ही किती स्टोरेजचा वापर करत आहात हे तुम्हाला या फिचरवरून कळू शकतं. या फिचरला तुम्ही व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जावून तपासू शकता.