नवी दिल्ली ः इन्स्टंट मॅसेजिंग अॅप WhatsApp आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी नवेनवे फिचर्स देण्याचा प्रयत्न करत असतं. यात आता व्हॉट्सअॅपनं आणखी एका फिचरची भर घातली आहे. म्यूट व्हिडिओ नावाचं नवं फिचर ग्राहकांच्या सेवेत आलं आहे.
या फिचरच्या माध्यमातून युजर्स व्हिडिओ पाठवण्यापूर्वी त्याचा आवाज म्यूट करू शकतात. याचाच अर्थ जर दुसर्या यूजरला हा व्हिडिओ मिळाला तर त्यामध्ये आवाज नसेल. या फिचरवर व्हॉट्सअॅप अनेक दिवसांपासून काम करत होतं.
फिचरचा वापर कसा कराल
तुम्ही ज्या यूजरला बिनाआवाजवाला व्हिडिओ पाठवू इच्छिता, सर्वात प्रथम त्या यूजरच्या अकाउंटवर जावं. मॅसेज बॉक्सवर क्लिक करून गॅलरीमध्ये जावं आणि जो व्हिडिओ पाठवू इच्छिता त्या व्हिडिओवर क्लिक करावं. तेव्हा तुमच्या डाव्या बाजूला स्पीकरचा आयकॉन दिसेल. त्या आयकॉनवर टॅप केल्यास व्हिडिओचा आवाज बंद होईल.
त्यापूर्वी लॉन्च झालं हे फिचर
व्हॉट्सअॅपनं नोव्हेंबर २०२० मध्ये सर्व युजर्ससाठी Disappearing Message फिचर प्रस्तूत केलं होतं. हे फिचर अॅक्टिवेट झाल्यानंतर व्हॉट्सअॅपवर पाठवले जाणारे मॅसेज, फोटो आणि व्हिडिओ एका आठवड्यानंतर आपोआप डिलिट होऊ शकतील.