मुंबई – पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी व्हॉट्सएप आणि फेसबूकपासून आपण लांब गेलो असल्याचे सांगितले आहे. टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांनीच याची सुरुवात केली. त्यांनी तर सिग्नल नावाचे एप वापरण्याचे आवाहन केले होते, मात्र शेखर शर्मा यांनी दोन्ही माध्यमांवर टिकाच केली आहे.
त्यांनी यूझर प्रायव्हसी पॉलिसीवरून व्हॉट्सएप आणि फेसबुकच्या विरोधात जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनंतरच त्यांनी सिग्नल एप वापरण्याचे आवाहन केले. तसेही लोक व्हॉट्सएपला दुसरा पर्याय शोधू लागले आहेत. त्यासाठी व्हॉट्सएप आणि फेसबुक बॅन करण्यासाठी कँपेन राबवनिले जात आहे. सोशल कॅपिटलचे सीईओ चामथ पालिहाप्टीया यांनी ट्वीट करून खुलासा केला आहे की व्हॉट्सएपने गेल्यावर्षी फेब्रुवारीतच फेसबुकसोबत सगळा डेटा शेअर करायला सुरुवात केली होती. त्यामुळे प्रायव्हसी तशीही संपुष्टात आली होती. पण शेखर शर्मा म्हणतात की मार्केटकडे खरी पॉवर असते. त्यामुळे आपण आता सिग्नल एपकडे वळायला हवे.
पेटीएम आणि व्हॉट्सएपमध्ये टक्कर
पेटीएमचा थेट सामना व्हॉट्सएपसोबत असल्याचे मानले जात आहे. त्यांनी व्हॉट्सएपवरून युपीआय पेमेंट सर्व्हिस बंद केली होती. पण व्हॉट्सएप सोडणारे शर्मा एकटे नाहीत. जगप्रसिद्ध व्हीसलब्लोअर एडवर्ड स्नोडेन यांनीदेखील लोकांना सिग्नलवर येण्याचे आवाहन केले आहे.
https://twitter.com/vijayshekhar/status/1348505147161210882