नवी दिल्ली – सगळ्या बाजूनं टीका झाल्यानंतर व्हॉट्सअॅपनं आपल्या प्रायव्हसी पॉलिसीला पुन्हा नव्यानं लागू करण्याची तयारी पूर्ण केली आहे. सोशल मीडियापैकी एक असलेला हा प्लॅटफॉर्म युजर्सना नव्यानं अपडेट पाठवणार असून, तो स्वीकार केल्यानंतर त्याचा उपयोग कायम ठेवता येणार आहे.
व्हॉट्सअॅपनं एका ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की, हा प्लॅटफॉर्म चॅटिंगसह खरेदी करण्याबरोबरच व्यावसायिकांना जोडण्याचा नवा पर्याय विकसित करत आहे. ही चॅटिंग बंधनकारक नसेल. परंतु काही आठवड्यात चॅटिंगवर अपडेट करण्याची सूचना मिळेल. त्यानंतर लोकांना व्हॉट्सअॅपचा वापर चालू ठेवायचा असेल तर हा अपडेटचा पर्याय स्वीकारावाच लागेल.
व्हॉट्सअॅपनं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील खासगी संदेश आणि मजकुराचे आदान-प्रदान सुरक्षित राहणार आहे. चॅटिंगसोबत खरेदीची सेवाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जवळपास दहा लाख लोक त्यांच्या चॅटिंगच्या माध्यमातून व्यवसायाशी जोडले गेले आहेत. त्यासाठी त्यांना फोन कॉल किंवा ईमेल करण्याची गरज भासत नाही. कस्टमर सर्व्हिस मानून या व्यवासायिकांकडून व्हॉट्सअॅप पैसे आकारतं.
व्हॉट्सअॅपनं असंच एक अपडेट मागील वेळी फोन स्क्रीनवर केलं होतं. हे अपडेट स्वीकारलं नाही तर युजर अकाउंट फेब्रुवारीमध्ये बंद करण्याचा इशारा दिला होता. यावर भारतासह अनेक देशांनी विरोध दर्शवला होता.