मुंबई – प्रोफाईल फोटो कसा सुरक्षित ठेवायचा, याचे तंत्र प्रत्येकाला माहिती असतेच असे नाही. त्यातही व्हॉट्सएअॅवरील सुरक्षेचे तंत्र तर अवगत करायलाच हवे. बरेचदा आपला मोबाईल नंबर अनोळखी लोकांपर्यंत पोहोचतो. त्यांच्यापासून तरी आपला प्रोफाईल फोटो सुरक्षित राहायलाच हवा.
आपण कार किंवा बसचे बुकींग करतो, एसी सर्व्हिसींग करतो किंवा मोबाईलद्वारा पेमेंट करतो. अशात अनोळखी लोकांपर्यंत आपला मोबाईल क्रमांक पोहोचतो. ही मंडळी आपले व्हॉट्सअॅप प्रोफाईल किंवा स्टेटसपर्यंत सहज पोहोचू शकतात. अर्थात व्यावसायिक लोक या भानगडीत पडत नाहीत. पण चुकीचे व्यवहार करणाऱ्यांना ही सवय असते. आपला प्रोफाईल फोटो किंवा स्टेटसचा स्क्रीनशॉट घेणे त्यांना फार अवघड नाही. त्यामुळे व्हॉटसअॅप वारणाऱ्यांनी कायम आपला प्रोफाईल फोटो लपवून ठेवायला हवा. त्यासाठी सिक्युरिटी फिचर उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात कुणालाही ब्लॉक न करता प्रोफाईल फोटो लपवून ठेवता येतो.
सर्वात पहिले व्हॉट्सएप सेटींग्समध्ये जायचे आणि त्यानंतर अकाऊंटवर क्लिक करायचे. त्यात प्रायव्हसीमघ्ये जाऊन प्रोफाईल फोटोवर टॅप करायचे. त्याठिकाणी डिफॉल्ट सेटींगचा पर्याय असेल. म्हणजे आपण माय कॉन्टॅक्ट ऑप्शनवर जाऊन क्लिक करायचे. जेणे करून ज्यांचे नंबर्स आपल्याकडे सेव्ह असतील त्यांनाच आपला प्रोफाईल फोटो दिसेल. त्यात सर्वांपासूनच प्रोफाईल फोटो लपवायची इच्छा असेल तर नोबडी असा पर्याय निवडावा.