नवी दिल्ली – व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक वापरले जाणारे इंस्टंट मेसेजिंग अॅप आहे. युजर्स कायमचे जोडले जावे यासाठी व्हॉट्सअॅपने वेगवेगळे फिचर्स दिले आहेत. आम्ही आज तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या सीक्रेट फिचर्सची माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही एखाद्याचा मेसेज वाचू शकतात. आपले लास्ट सीन लपवून तुम्ही ऑनलाइन राहू शकतात. तुमचे या फिचर्सकडे कधीही लक्ष गेले नसेल. हे दोन्ही फिचर मेसेजिंग अॅपच्या प्रायव्हसी सेक्शनमध्ये लिस्टेड आहेत. तर चला मग आपण या दोन्ही फिचर्सबद्दल जाणून घेऊयात.
लास्ट सीनला कसे लपवावे
१) तुमचे लास्ट सीन लपविण्यासाठी व्हॉट्सअॅप उघडून सेटिंग सेक्शनमध्ये जावे.
२) अकाउंट सेक्शनमध्ये जाऊन प्रायव्हसीवर टॅप करावे. तुम्ही जी सेटिंग कराल ती मोबाईल आणि वेब व्हर्जन या दोन्हीवर लागू होईल, याकडे लक्ष द्यावे.
३) आता लास्ट सीन पर्यायावर टॅप करून सेटिंगला ‘Nobody’ वर करावे.
नोट ः प्रायव्हसीमध्ये तुम्हाला तीन पर्याय दिसतील. त्यामध्ये ‘EveryOne’, ‘My Contacts’ आणि ‘Nobody’चा समावेश आहे. ज्या लोकांकडे तुमचा व्हॉट्सअॅप नंबर आहे, ते तुमचा लास्ट सीन पाहू शकतात, असा पहिल्या पर्यायाचा अर्थ आहे. तुमच्या कॉन्टॅक्टमधील लोकच व्हॉट्सअॅपवर तुमचे लास्ट सीन पाहू शकतात, असा दुस-या पर्यायाचा अर्थ आहे. शेवटच्या पर्यायाला इनेबल केल्यावर तुम्ही व्हॉट्सअॅप शेवटचे कधी पाहिले होते, हे कोणीही पाहू शकत नाही, असा तिस-या पर्यायाचा अर्थ आहे.
ब्लू टिक कसे लपवाल
व्हॉट्सअॅपवर ब्लू टिक लपविण्याची प्रक्रिया सारखीच आहे. हे फिचर तुम्हाला प्रायव्हसी सेक्शनमध्ये दिसेल. पण याच नावाने ते तुम्हाला दिसणार नाही. व्हॉट्सअॅपवर या फिचरचे नाव रिड रिसिप्ट आहे. ब्लू टिकला ते डिसएबल करेल.
१) सर्वात आधी व्हॉट्सअॅपवर जावे आणि सेटिंग सेक्शनला उघडावे.
२) आता ‘Account’ वर जाऊन प्रायव्हसी पर्यायावर टॅप करावे.
३) ‘Read Receipts’ या पर्यायापर्यंत स्क्रोल करावे आणि चॅटवर ब्लू टिक लपविण्यासाठी त्याला डिसएबल करावे.