विशेष प्रतिनिधी, पुणे
WhatsApp च्या सर्व युजर्सना दिलासा मिळणार आहे. WhatsApp एका नव्या फिचरवर काम करत आहे. हे फिचर कार्यान्वित झाल्यानंतर युजर्सना आपल्या चॅट हिस्ट्रीला शिफ्ट करू शकता येणार आहे. तसेच युजर्स एका मोबाईल नंबरवरून दुस-या मोबाईल नंबरवर आपले WhatsApp अकाउंट शिफ्ट करू शकणार आहेत. आयओएस प्लॅटफॉर्मवरून अँड्रॉइडवरसुद्धा आपले अकाउंटची चॅट हिस्ट्री शिफ्ट करू शकता येणार आहेत.
अँड्रॉइडवरू आयओएस किंवा आयओएसवरून अँड्रॉइड स्मार्टफोनवर सहज शिफ्ट करणे शक्य होणार आहे. वेगवेगळ्या मोबाईल नंबरवर एकच अकाउंट चालविण्याची सुविधा मिळणार आहे. या सुविधेमुळे युजर्सना आपला मोबाईन नंबर बदलता येणार आहे. सध्या ज्या WhatsApp अकाउंटवर तुमच्या मोबाईलची नोंदणी झालेली आहे, त्यावरच WhatsApp अकाउंट वापरण्याची सुविधा आहे. यामुळे अनेक युजर्सना अनेक वेळा WhatsApp मोबाईल नंबरवर विनाकारण अॅक्टिव्ह राहावे लागत होते. चॅट हिस्ट्री ट्रांसफर करण्याचे वृत्त सर्वात आधी WhatsApp फिचर ट्रॅकर वेबसाइट Webetainfo ने दिले होती.
कसे काम करणार नवे फिचर
Wabetainfo च्या वृत्तानुसार, या फिचरवर WhatsApp चे काम सुरू आहे. नवे फिचर कार्यान्वित झाल्यानंतर युजर्सना WhatsApp च्या सेटिंगमध्ये चॅट हिस्ट्रीला स्थलांतरित करण्याचा पर्याय असेल. त्यासाठी युजर्सना सर्वात आधी WhatsApp ला प्ले स्टोअरमधून अपडेट करावे लागेल. याची प्रक्रिया खूपच सोपी आहे. चॅट हिस्ट्रीला सिंगल टॅप करून ट्रांसफर केले जाऊ शकते. त्यासाठी स्टार्ट बटनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर चॅट हिस्ट्री डिलिट करण्याचा पर्याय आपोआप सुरू होऊ शकेल. नव्या अपडेटनंतर फक्त चॅटच नव्हे, तर मीडिया फाईल स्थलांतरित करता येणार आहेत.