मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वसामान्यपणे मोबाईल वापरणाऱ्याने पूर्ण काळजी घेतली तर सायबर गुन्हेगारांपासून वाचणे शक्य आहे. परंतु, जरा चूक झाली तर कधी काय घडेल, याचा नेम नाही. मग छोटीशी चूक मोठे नुकसान घडवू शकते. सध्या पिंक व्हॉट्सएपच्या नावावर लोकांना असेच फसवले जात आहे.
व्हॉट्सएपचे गुलाबी व्हर्जन चांगलेच चर्चेत आहे. दिसायला छान असल्य़ामुळे लोक ते अपलोड करतात, पण आपला संपूर्ण डेटा चोरला जात असल्याची खबरही लागत नाही. केंद्र सरकारने खरे तर अॅडव्हायजरीच्या माध्यमातून लोकांना पिंक व्हॉट्सएप नावाच्या घोटाळ्यापासून सुरक्षित राहण्यास सांगितले आहे. या माध्यमातून तुमचा मोबाईल हॅक होत असल्याचेही सरकारने म्हटले आहे. तरीही लोक भूरळ पडत आहे आणि अनेक लोक त्याला बळीही पडत आहेत. मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, ‘मोबाइलवर डाऊनलोड केलेले बनावट अॅप्स तात्काळ अनइंस्टॉल करा.
योग्य पडताळणी केल्याशिवाय अज्ञात स्त्रोतांकडून मिळालेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका, नेहमी वैध वेबसाइटवरून किंवा अधिकृत स्टोअरवरूनच अॅप इंस्टॉल करा.’ पोलीस नेहमीच सांगत असतात की ओटीपी, क्रेडेन्शीयल्स, पासवर्ड आदी गोष्टी कधीही दुसऱ्यांसोबत शेअर करू नका. बँकांद्वारेही सातत्याने त्यासंदर्भातील मेसेजेस नियमित पाठविण्यात येतात. पण तरीही लोकांच्या हातून चुका होतातच. पिंक व्हॉट्सएपच्या संदर्भात तुम्लाहा एक लिंक पाठविली जाते. त्यात दिसणारे व्हॉट्सएपचे पिंक व्हर्जन अतिशय आकर्षक असल्यामुळे ते डाऊनलोड करण्याचा मोह यूझर्सना आवरत नाही. आकर्षक फिचर्च मिळतील, असे सांगितले जाते. पण अॅप डाऊनलोड करताच यूजर्सचा वैयक्तिक डेटा पूर्णपणे चोरला जातो.
जाहिरातींचा फडीमार
पिंक व्हॉट्सएप इन्स्टॉल केल्यानंतर फोनवर जाहिरातींचा भडिमार होतो. मोबाईलवरील नियंत्रण हळूहळू सुटण्याची शक्यता आहे. मोबाइल हॅक होऊ शकतो आणि फसवणूक करणाऱ्यांना तुमचा कॅमेरा, स्टोरेज, कॉन्टॅक्टमध्येही प्रवेश मिळू शकतो.