सोमवार, सप्टेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

देशाच्या विकासासाठी खरी गरज आहे ती नीलक्रांतीची… पण ती काय आहे? आणि कशी होईल?

by Gautam Sancheti
मार्च 22, 2023 | 9:43 pm
in इतर
0
india

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– आपलं पर्यावरण –
नीलक्रांती केव्हा…..

प्रचंड नैसर्गिक संपदा असलेल्या आपल्या देशाने कायम विपदांचा सामना केला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळात या कॄषीप्रधान देशाने अन्न धान्याच्या तुटवड्याची समस्या अनुभवली. तेच पाण्याचं, तेच वीजेचं, तेच इतर सुविधांचं झालं. पण नंतरच्या काळात सरकार मधील दॄष्टी असलेल्या नेत्यांच्या कल्पकतेतून हरीत क्रांती घडविता आली, हरीत क्रांतीच्या माध्यमातून आपण कॄषी क्षेत्रात सक्षम झालो. स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळात जी अन्न धान्याची आयात करावी लागायची ती परिस्थिती बदलून आपण निर्यातीसाठी सज्ज आहोत. आपण नुसतेच स्वंयपूर्ण नसून भरभक्कम निर्यात करीत आहोत.

Dr Pravin Mahajan
डॉ. प्रवीण महाजन
जल अभ्यासक
मोबाईल – 9822380111

श्र्वेतक्रांती मुळे भारत आज दुध व दुग्धजन्य पदार्थामध्ये जगात दुस-या क्रमांकावर पोहचला आहे. नाहीतर भुकटीवर म्हणजे पावडरवर आपण अवलंबून होतो ते आज नाही. आज संगणक क्षेत्रात भारत अग्रेसर राहीला तो रंगविहीन क्रांतीमुळे. साधन, संसाधन आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीतही मागील कालावधीत आम्ही केलेली प्रगती नेत्रदीपक अशीच आहे. पण पाण्याचे क्षेत्रात आपण मागे आहोत.

पाणी किती उपलब्ध आहे ह्यापेक्षा त्याचे व्यवस्थापन किती उत्कृष्ट आहे ह्यावर समाजाचा विकास अंवलबून असतो. या करीता पाण्याबाबतची नीलक्रांती केव्हा होणार अन कशी होणार हा मुख्य प्रश्न उभा आहे. पाणी आणि इतर नैसर्गिक संपदांबाबत मात्र आपली सर्वांचीच भूमिका अगदीच प्राथमिक स्तरावर रेंगाळली आहे. खरंतर आपली समाजव्यवस्था पाण्याच्या अवतीभवती केंद्रीत राहिली आहे. फार पूर्वी पासून आपली गावं, वस्त्या पाण्याच्या स्त्रोतांभोवती वसल्या आहेत. बव्हतांशी त्या नदी, नाले, तलावांच्या जवळ वसवल्या गेल्या आहेत. आधी पाण्याची सोय, मग इतर सुविधांचा विचार, असाच आमच्या पूर्वजांचा प्राधान्य क्रम राहिला. आता अनेकाच्या कामात आणि विचारांत एक प्रमुख धागा पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत जपण्याचा राहिला आहे. समाज मात्र जे जे निसर्गाने अमाप दिले आहे, त्याबाबत बेफिकीर झाला आहे. म्हणूनच यासर्वाना या विषयी साक्षर करण्यापासून तर मग पुढे प्रत्यक्ष जलसंवर्धनापर्यंत घेऊन जावे लागणार आहे.

महात्मा गांधी यांच्या संदर्भातील एक प्रसंग आहे. एकदा अलाहाबाद येथे असताना एक दिवस सकाळी आंघोळ आटोपल्यावर गांधीजी खूप अस्वस्थ झाले होते. कोणी तरी त्यांना विचारले की काय झाले? इतके अस्वस्थ का दिसताहात? गांधीजी म्हणाले, गड्या आज माझ्या हातून एक चूक घडली. मी आंघोळ करताना वाजवीपेक्षा जास्त पाणी वापरले. सोबतची व्यक्ती खळाळून हसली. म्हणाली, बापू काय बोलता? अहो जिथे गंगा यमुना दुथडी भरून वाहतात अशा अलाहाबादमध्ये आहोत आपण, आणि तुम्ही बादलीभर पाणी, जास्त वापरलं म्हणून इतके अस्वस्थ झाला आहात? यावर गांधीजी गांभीर्याने म्हणाले, इथल्या गंगा यमुना काही माझ्या एकट्यासाठी वाहात नाहीत. संपूर्ण समाजाचा त्यावर अधिकार आहे. ते काही नाही, मी आज बेजबाबदारपणे लागलो आहे…. गांधीजींच्या या विचारांपासून प्रत्येकाने धडा घेतला तर जलसाक्षरतेचे काम सोपे होईल.

कायम संगणक आणि मोबाईल फोन भोवती रमणाऱ्या समाजाला पावसाचे प्रमाण वाढवण्यासाठी झाडं लावणे आवश्यक आहे, पावसाच्या पाण्याचे पूर्नभरण करा. पुढील पीढीच्या भविष्यासाठी पाणी वाचवा, वारेमाप वापर करू नका हे समजावून सांगावे लागते, हे चित्र ही बदलावे लागेल.

पाणीक्षेत्रात काम करणे फार सोपे नाही. कधी कधी काम करतांना असे वाटते कि आपण वेड्याच्या कारखान्यांत काम करीत आहे एवढं कठीन आहे हे सर्व. पाण्याला किंमत नाही म्हणून समाज बेफिकीर आहे हे चित्र योग्य नाही. आजही महाराष्ट्रातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. सिंचन सुविधांच्या अभावामुळे पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची संख्या पुरोगामी महाराष्ट्रात दखलपात्र ठरण्याइतकी मोठी असावी हे चित्र काही भूषणावह नाही.

डॉ. प्रवीण महाजन,
????जल अभ्यासक,
????डॉ. शंकररावजी चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कार्थी, महाराष्ट्र शासन.
????स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत चला जाणूया नदीला राज्यस्तरीय समिती सदस्य, महाराष्ट्र शासन.
what is nilkranti blue revolution by Dr Pravin Mahajan

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण सुरू; बघा, त्याचे हे थेट प्रक्षेपण

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पिंट्या आणि जिलेबी विक्री

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

ed
संमिश्र वार्ता

ईडीने बाईकबॉट घोटाळ्याप्रकरणी ३९४.४२ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता केली जप्त

सप्टेंबर 1, 2025
jail11
क्राईम डायरी

नाशिकमध्ये भरवस्तीत गावठी दारूचे गाळप….महिलेसह अन्य एकास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सप्टेंबर 1, 2025
Education6ZT1 e1756688555854
संमिश्र वार्ता

आश्चर्य…थंड मीरा ताऱ्यांमुळे वैश्विक विस्ताराच्या स्वतंत्र दराच्या मापनाला मिळाला नवा आधार

सप्टेंबर 1, 2025
WhatsApp Image 2025 08 30 at 5.36.53 PM
संमिश्र वार्ता

श्री साईबाबा संस्थानची ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

सप्टेंबर 1, 2025
shinde fadanvis pawar1 e1710312448933
महत्त्वाच्या बातम्या

आंदोलनावर आज तोडगा निघणार? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची रात्री उशीरा बैठक

सप्टेंबर 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कोठेही पैसे गुंतवू नका, जाणून घ्या, सोमवार, १ सप्टेंबरचे राशिभविष्य

ऑगस्ट 31, 2025
Screenshot 20250831 192907 Facebook
स्थानिक बातम्या

धक्कादायक…नाशिक येथे नंदिनी नदीमध्ये स्फोटके…हजारो कांड्या गोण्यामध्ये मिळाल्या

ऑगस्ट 31, 2025
Screenshot 20250831 144755 Facebook
महत्त्वाच्या बातम्या

जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी आता सरकारला नवा पर्याय…केले हे आवाहन

ऑगस्ट 31, 2025
Next Post
joke

इंडिया दर्पण - हास्य षटकार - पिंट्या आणि जिलेबी विक्री

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011