विशेष प्रतिनिधी, पुणे
एलआयसी कार्ड सर्व्हिसेस लिमिटेड (एलआयसी सीएसएल) ने आयडीबीआय बँकेसोबत मिळून कॉन्टॅक्टलेस प्रीपेड गिफ्ट कार्ड लाँच केले आहे. या कार्डचे शगुन (Shagun) असे नामकरण केले आहे. या कार्डला रुपे प्लॅटफॉर्मवरून बाजारात सादर केले आहे.
एलआयसी कार्ड आणि आयडीबीआय बँकेने गिफ्ट कार्ड बाजारात विस्तारित करण्याचे लक्ष्य ठेवून सादर केले आहे. गिफ्टिंगच्या कॅशलेस माध्यमांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशासह ग्राहकांना व्यापक स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य कंपनीने समोर ठेवले आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात शगुन कार्ड देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी आणि अनुषांगिक कंपन्यांमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध असेल. अधिकृत परिषदा आणि कार्यक्रमांदरम्यान पुरस्कार किंवा रिवार्ड देण्यासाठी या कार्डचा वापर केला जाणार आहे.
कार्डची मर्यादा तीन वर्ष
शगुन गिफ्ट कार्डाच्या सहाय्याने ५०० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंत कोणत्याही रकमेची भेट दिली जाऊ शकते. या कार्डद्वारे ग्राहक एकापेक्षा अधिक ट्रॅजॅक्शन करू शकतात. कार्डची मर्यादा साधारण तीन वर्षे आहे. रूपे कार्ज व्यापक स्वरूपात स्वीकार्य आहे. अशा पद्धतीने लाखो मर्चंट आउटलेट आणि ई कॉमर्स संकेतस्थळांवर शगुन गिफ्ट कार्डचा वापर खरेदीसाठी केला जाऊ शकतो. डिपार्टमेंटर स्टोअर, पेट्रोल पंप, रेस्टॉरंट, ज्वेलर्स, स्टोअर्स आदी ठिकाणी सामान खरेदीसाठीसुद्धा कार्डचा वापर होऊ शकतो. त्याशिवाय कार्डच्या माध्यमातून ऑनलाइन शॉपिंग, बिल भरणा, विमान, रेल्वे आणि बसचे तिकिट बुक करू शकणार आहात.
५ हजारांपर्यंत व्यवहार
या कार्डद्वारे कोणतीही व्यक्ती संपर्काविना ५ हजार रुपयांपर्यंत व्यवहार करू शकते. असे व्यवहार करताना तुम्हाला PoS टर्मिनलवर पिन नंबर टाकण्याची गरज पडत नाही. हे कार्ड प्री-रॅप्ड येते. सोप्या पद्धतीने कोणालाही भेट दिली जाऊ शकते. त्यासोबतच तुम्हाला वाटल्यास संबंधित व्यक्तिला मेसेजही पाठवू शकता. हे कार्ड ‘m-passbook’ या मोबाईल अॅपला आपोआप लिंक होते. त्याद्वारे तुम्ही वर्तमान परिस्थितीतील व्यवहार, हिस्ट्री, कार्ड बॅलेन्स आदी पाहू शकणार आहात. या सेवेसाठी कस्टमर सपोर्ट टीम असून, ती २४ तास उपलब्ध असते.