मुंबई – कोरोना महामारीनंतर आता भारतीय आयपीओ बाजाराच्या दृष्टीने 2021 हे वर्ष अधिक चांगले सिद्ध होऊ शकते. येत्या काही दिवसात सुमारे 70 कंपन्या त्यांचा IPO लाँच करणार आहेत. परंतु IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, त्याबद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे , तरच आपण पैसे योग्य ठिकाणी गुंतवू शकालो, याची खात्री मिळते.
विशेष म्हणजे 2021 च्या पहिल्या नऊ महिन्यांत 9.7 अब्ज डॉलर्सच्या कमाईसह भारत जगातील अव्वल आयपीओ बाजारात स्थान मिळवू शकतो. तसेच ही रक्कम एकूण जागतिक आयपीओ फंडाच्या केवळ 3 टक्के आहे. आता अनेक नागरिकांना वाटत असेल की, हा IPO म्हणजे काय भानगड आहे बुवा ? आणि अनेक जण त्यात गुंतवणूक करून लाखो नफा कसा कमवतात?त्यामुळे IPO त्याबद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. IPO शी संबंधित काही महत्वाची माहिती जाणून घेऊ या…
IPO म्हणजे काय ?
आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग, जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची संधी सामान्य जनतेला देते, तेव्हा ही प्रक्रिया आयपीओद्वारेच पूर्ण होते. आयपीओ लाँच आणि शेअर्सचे वाटप झाल्यानंतर कंपनीची लिस्टिंग केली जाते. साधारणपणे कोणत्याही कंपनीच्या आयपीओची सुरुवातीची किंमत कमी असते. तथापि, शेअर बाजारात लिस्टिंग केल्यानंतर, त्याच्या शेअरच्या किमती बाजारानुसार वाढत किंवा कमी होत राहतात. कोणतीही कंपनी गुंतवणूकदारांना त्याच्या विस्तारासाठी IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करते.
गुंतवणूक कशी करावी
भारतीय आयपीओच्या दृष्टीकोनातून 2021 हे वर्ष खूप चांगले गेले आहे. यावर्षी अनेक कंपन्यांचे आयपीओ बाजारात आले आहेत. येत्या काही दिवसात सुमारे 70 कंपन्या त्यांचा IPO लाँच करणार आहेत. जेव्हाही एखादी कंपनी आपला आयपीओ बाजारात आणते तेव्हा ती गुंतवणूकदारांसाठी काही कालावधीसाठी आयपीओ खुली ठेवते. साधारणपणे हा कालावधी 3 ते 10 दिवसांचा असतो. या दरम्यान, गुंतवणूकदार कंपनीच्या वेबसाइटवर किंवा नोंदणीकृत दलालीद्वारे त्या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतो. IPO उघडण्याच्या समाप्तीनंतर, कंपनी शेअर्स वाटप करते आणि त्यानंतर ते शेअर्स स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होतात.