रविवार, नोव्हेंबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

म्युकरमायकोसिस कशामुळे होतो, प्रतिबंध कसा करता येतो, सामान्य लक्षणे काय आहेत?

मे 14, 2021 | 6:03 am
in संमिश्र वार्ता
0
संग्रहित प्रातिनिधीक फोटो

संग्रहित प्रातिनिधीक फोटो


नवी दिल्ली – सध्या जेव्हा नागरिक कोरोना विषाणूच्या संसर्गापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याची शक्य तेवढी काळजी घेत आहेत,त्यावेळी बुरशीजन्य आजाराचा आणखी एक धोका निर्माण झाला आहे.म्युकरमायकोसिस, हा बुरशी संसर्गाचा आजार कोविड मधून बरे होत असलेल्या किंवा बरे झालेल्या रुग्णांना होत असल्याचे आढळत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत या आजाराने सुमारे 10 जणांचा मृत्यू झाला असून 2,000 हून अधिक लोकांना या दुर्मिळ आजाराचा संसर्ग झाला आहे. काही रुग्णांना या आजारामुळे आपली दृष्टीही गमवावी लागली आहे.
म्युकरमायकोसिस कशामुळे होतो?
वातावरणातील बुरशीजन्य कणांच्या संपर्कात आल्याने लोकांना म्युकरमायकोसिसचा संसर्ग होऊ शकतो. शरीरावर कापण्यामुळे, खरचटण्यामुळे, भाजण्यामुळे झालेल्या जखमेतून किंवा इतर प्रकारच्या त्वचारोगांमुळे झालेल्या जखमेतून या बुरशीचा शिरकाव झाल्यामुळेही हा संसर्ग होऊ शकतो.
आयसीएमआरने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड रुग्णांमधील खालील परिस्थितीमुळे म्युकरमायकोसिस संसर्गाचा धोका वाढू शकतो.
  1. अनियंत्रित मधुमेह
  2. स्टेरॉईडच्या वापरामुळे रोगप्रतिकारक्षमता कमकुवत होणे
  3. अतिदक्षता विभागात/ रुग्णालयात दीर्घकाळ दाखल असणे
  4. अवयव प्रत्यारोपण/ ट्युमर( कर्करोगकारक पेशींची उपस्थिती) नंतर सहव्याधी
  5. व्होरिकोनॅझोल उपचार( गंभीर बुरशी संसर्गावरील उपचार)
या रोगाचा आणि कोविड-19 चा संबंध काय?
म्युकरमायकोसिस किंवा ज्याला सामान्यपणे काळी बुरशी असे म्हटले जाते, तो बुरशी प्रादुर्भावामुळे शरीरात निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे होणारा आजार आहे. सभोवतालच्या वातावरणात असलेल्या म्युकरमायसेटीस या सूक्ष्म-जीवांमुळे हा आजार होतो. म्युकरमायसेटीस मातीत किंवा पाने, खते अशा सडत/विघटित होत जाणाऱ्या पदार्थांमध्ये आढळतात.कोविडमधून बरे होत असलेल्या किंवा बरे झालेल्या रुग्णांना या बुरशीचा संसर्ग होत असल्याचे आढळत आहे .
केवळ कोविड रुग्णच नाही ज्यांना मधुमेह आहे, अशा अनेक, ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे अशा लोकांनाही म्युकरमायकोसिस होऊ शकतो. आपल्या शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती अशा बुरशीच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यास सक्षम असते. मात्र, कोविड रुग्णांवर उपचार करतांना रोगप्रतिकार दाबून टाकणारी डेक्समेथासोन सारखी औषधें असतात. या औषधांमुळे माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो. त्याशिवाय,जे रुग्ण ऑक्सिजन आधारावर अतिदक्षता विभागात उपचार घेत असतात, तिथे या प्रणालीमध्ये ह्युमिडीफायर असते,ज्यामुळे पाण्यातील आर्द्रतेतून बुरशी संसर्ग होण्याची शक्यता असते.
मात्र, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक कोविड रुग्णाला म्युकरमायकोसिसचा धोका संभवतो. हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे मात्र त्याचवेळी जर त्यावर योग्य आणि वेळेत उपचार केले गेले नाहीत, तर तो प्राणघातकही ठरु शकतो.आजाराचे लवकर निदान आणि उपचार यावर बरे होण्याचे प्रमाण अवलंबून असते.
आजाराची सामान्य लक्षणे काय आहेत?
म्युकरमायकोसिस हा आजार सायनस म्हणजेच नसिकेच्या आतल्या हाडात, नाक, दात आणि त्यानंतर डोळ्यांकडे पसरतो. नंतरच्या पातळीत हा संसर्ग फुफ्फुसे आणि मेंदूपर्यंतही पसरु शकतो.या संसर्गामुळे चेहरा आणि नाकावर काळे डाग पडतात किंवा तिथल्या त्वचेचा रंग बदलतो. दृष्टी अधू होते, छातीत दुखू लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे आणि खोकल्यातून रक्त पडणे इत्यादी लक्षणे जाणवू शकतात.
मात्र, नाक चोंदण्याच्या सगळ्याच रुग्णांना जिवाणूजुन्या सायनसिटीस झाला असावा असे गृहीत धरु नये असा सल्ला, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिला आहे.विशेषतः कोविड रुग्णांवर उपचार सुरु असताना किंवा झाल्यावर हे लक्षात घ्यावे. हा बुरशीसंसर्ग आहे का हे जाणून घेण्यासाठी, वैद्यकीय तपासणी आणि सल्ला घेणे उचित ठरेल.
imVLDW
त्यावर उपचार कसे करतात?
साध्या त्वचासंसर्गापासून म्युकरमायकोसिसची सुरुवात होत असली तरी तो शरीराच्या इतर भागात पसरू शकतो. यावर उपचार करताना सर्व मृत आणि संसर्ग झालेल्या ऊती शस्त्रक्रिया करून काढून टाकाव्या लागतात, त्यामुळे काही रुग्णांना वरचा जबडा गमवावा लागतो किंवा काही वेळा अगदी डोळा देखील गमवावा लागतो. तसेच 4 ते 6 आठवड्याचे इंट्राव्हेनस अँटी- फंगल उपचार, रुग्णाला संसर्गमुक्त करण्यासाठी करावे लागतात. याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होत असल्याने सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, अंतर्गत औषध तज्ञ, इंटेन्सिव न्यूरॉलॉजिस्ट, कान- नाक- घसा तज्ञ, नेत्रविकारतज्ञ, दंतवैद्य, शल्यविशारद आणि इतरांचा समावेश असलेल्या एका टीमची उपचारांसाठी गरज भासते.
म्युकरमायकोसिसला प्रतिबंध कसा करता येतो ?
मधुमेही असलेल्या कोविड रुग्णांनी अतिशय काळजी घेणे गरजेचे आहे. मधुमेह नियंत्रणात ठेवणे हा सर्वात आधी केल्या जाणाऱ्या प्रतिबंधक उपचारांपैकी एक असल्याचे आयसीएमआरने सांगितले आहे. स्वयं उपचार आणि स्टेरॉईडचा प्रमाणाबाहेर वापर यामुळे जीवावर बेतू शकते आणि म्हणूनच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसारच औषधे घेतली पाहिजेत.
स्टेरॉईडच्या अयोग्य वापरांमुळे होणाऱ्या विपरित परिणामांबाबत बोलताना नीती आयोगाचे (आरोग्य) सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी सांगितले की कोविड-19 च्या संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात स्टेरॉईडचा वापर कधीही करू नये. रुग्णाने योग्य त्या औषधांचाच वापर केला पाहिजे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विशिष्ट दिवसच या औषधांचा वापर केला पाहिजे. औषधांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी त्यांचा तर्कसंगत वापर झाला पाहिजे.
स्टेरॉईड व्यतिरिक्त टोसिलिझुमाब, आयटोलिझुमाब यांच्या वापराने देखील रोगप्रतिकारक्षमता प्रणालीवर परिणाम होतो. कोरोना विषाणू दाहकारक सायटोकिन्सचा स्राव सोडत असल्याने मल्टी ऑर्गन फेल्युअर सारखी गंभीर स्थिती निर्माण होत असल्याने त्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांमुळे रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे ही औषधे योग्य प्रकारे वापरली नाहीत तर त्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे बुरशीसंसर्गाला तोंड देण्यामध्ये ती अपयशी ठरण्याचा धोका निर्माण होतो. रोगप्रतिकारक्षमतेला चालना देणाऱ्या किंवा ती दाबून टाकणाऱ्या अशा इम्युनोमॉड्युलेटिंग ड्रगचा वापर कोविड-19 रुग्णांनी थांबवावा, अशी सूचना आयसीएमआरच्या मार्गदर्शक नियमावलीत करण्यात आली आहे. असे विपरित परिणाम टाळण्यासाठी टोसिलिझुमाबच्या मात्रेमध्येही कोविड कृती दलाने सुधारणा केली आहे. तसेच योग्य प्रकारची स्वच्छता राखण्यामुळे देखील हा बुरशी संसर्ग टाळता येतो.
“ ऑक्सिजनचे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या ह्युमिडीफायरमधील पाणी स्वच्छ आहे की नाही आणि ते वारंवार बदलले जात असल्याची खातरजमा करावी. पाण्याची गळती कुठेही होत नसल्याची खातरजमा करावी जेणेकरून ओल्या पृष्ठभागांवर बुरशीची वाढ होणार नाही. रुग्णांनी आपले हात त्याचबरोबर शरीर स्वच्छ ठेवून शरीराची योग्य प्रकारे स्वच्छता राखावी, असे डॉ. पॉल यांनी सांगितले आहे.
कोविडमधून बरे झाल्यावरही दक्षता आवश्यक
कोविडमधून बरे झाल्यानंतर वर उल्लेख केलेल्या लक्षणांवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवावे आणि कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये कारण रुग्ण बरे झाल्यानंतर अनेक आठवडे किंवा अगदी महिन्यांनी देखील हा संसर्ग झाल्याची उदाहरणे आढळली आहेत. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी रुग्णांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार स्टेरॉईड्सचा आवश्यक तितकाच वापर करावा. या संसर्गाचे वेळेवर निदान झाल्यास त्यावरील उपचार सुलभ होतात.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लसीकरणाबाबत केंद्र सरकारने केली ही मोठी घोषणा

Next Post

नेपाळमध्ये पुन्हा नाट्यमय घडामोडी; मध्यरात्री राष्ट्रपतींकडून मोठी घोषणा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
oli

नेपाळमध्ये पुन्हा नाट्यमय घडामोडी; मध्यरात्री राष्ट्रपतींकडून मोठी घोषणा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011