मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
आजच्या काळात लठ्ठपणा कोणालाच नको असतो, त्यासाठी प्रत्येक जण वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो. याकरिता काही बरेच जण तासनतास व्यायाम करूनही आपले ध्येय साध्य करण्यात अपयशी ठरतात. असे घडण्याचे कारण म्हणजे ते योग्य आहाराचे पालन करत नाहीत. बरेच जण व्यायामाच्या तासांनंतर असे पदार्थ खातात, त्यामुळे सर्व मेहनत वाया जाते. तसेच वर्कआउटच्या अर्ध्या तासात प्रथिनेयुक्त गोष्टी खाव्यात, तर शरीराला टोन अप करण्यासाठी व्यायाम करणाऱ्यांनी कार्ब खाणे टाळावे. येथे आम्ही अशा काही गोष्टी सांगत आहोत, त्या व्यायामानंतर खाऊ शकता.
भरपूर पाणी प्या
व्यायाम केल्यावर शरीरातून इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. त्याची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्हाला पाण्याची गरज आहे. अशा स्थितीत व्यायाम केल्यानंतर पुन्हा एनर्जी रिचार्ज करण्यासाठी भरपूर पाणी प्या.
प्रोटीन शेक
प्रोटीन शेक प्रसिद्ध आहेत. कारण ते व्यायामानंतर प्रोटीन मिळवण्याचा एक सोपा मार्ग आहे. तथापि, आपण चांगल्या दर्जाचे प्रोटीन शेक प्यावे याची खात्री करा. जर प्रोटीन पावडर नसेल तर चॉकलेट मिल्कही पिऊ शकता. लक्षात ठेवा की, भरपूर साखर असलेल्या गोष्टी पिऊ नका.
अंडी
अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे स्नायूंच्या वाढीस मदत होते. व्यायामानंतर तुम्ही अंडी खाऊ शकता. रिपोर्ट्सनुसार, अंड्यातील पिवळ बलकमधील पोषक द्रव्ये स्नायूंना चांगल्या प्रकारे उत्तेजित करण्यास मदत करतात.
पनीर
शाकाहारी असाल तर व्यायामानंतर पनीर खाऊ शकता. चीजमध्येही प्रथिने भरपूर असतात. यासोबतच ते हाडांसाठीही चांगले असते, कारण त्यात कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते.
ओट्स
हा देखील एक चांगला पर्याय आहे- ओट्स हे अन्नधान्य आहे, ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स चांगल्या प्रमाणात असतात. वजन कमी करण्यास आणि स्नायू तयार करण्यास मदत करते.
बटर
वर्कआउट केल्यानंतर बरेच नागरिक बटर खातात. त्यात हेल्दी फॅट तसेच प्रोटीन असते. ते चवीलाही चांगले असते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाणे टाळावे.