मुंबई – आयपीएल २०२१ चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात शुक्रवारी रंगणार आहे. अंतिम सामन्यात दोन्ही संघादरम्यान चांगली लढत पाहायला मिळणार आहे. २०१२ झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यातही सीएसके आणि केकेआर आमनेसामने आले होते. तेव्हा कोलकाताने चेन्नईला मात दिली होती.
आता २०२१ म्हणजेच २०१२ च्या शेवटच्या दोन अंकाची अदलाबदल केली तर या वेळी प्लेऑफचे निकालसुद्धा २०१२ च्या तुलनेत याचप्रकारे बदलले आहेत. आता याला तुम्ही योगायोग म्हणा किंवा आणखी काही, पण खरेच असे झाले आहे. हा योगायोग चेन्नईच्या फॅन्सना आनंदाचा क्षण देऊ शकतो.
२०१२ : प्लेऑफमध्ये काय घडले होते?
आयपीएलच्या २०१२ च्या सिझनमध्ये कोलकाताचा संघ साखळी सामन्यात दुसर्या स्थानावर होती. तर चेन्नई चौथ्य स्थानावर होती. तेव्हा क्वालिफायर-१ मध्ये कोलकाताचा सामना दिल्लीसोबत झाला होता. कोलकाताने प्रथम फलंदाजी करत दिल्लीला मात देऊन अंतिम सामन्यात धडक मारली होती. त्यानंतर एलिमिनेटर फेरीत चेन्नईने प्रथम फलंदाजी करत विजय मिळवला होता. क्वालिफायर-२ फेरीमध्ये प्रथम फलंदाजी करत दिल्लीला मात दिली होती आणि अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता. अंतिम सामन्यात चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत कोलकाताने बाजी मारली होती.
२०१२ आयपीएल
गुणतालिकेत (साखळी सामन्यांनंतर) केकेआर (दुसर्या), सीएसके (चौथ्या)
क्वालिफायर -१ केकेआरकडून डीसीचा पराभव- प्रथम फलंदाजी
एलिमिनेटर सीएसकेचा विजय (प्रथम फलंदाजी)
क्वालिफायर -२ सीएसकेकडून डीसीचा पराभव- प्रथम फलंदाजी
अंतिम सामना केकेआरकडून सीएसकेचा पराभव
आता २०२१ मध्ये बरोबर २०१२ च्या उलटे झाले आहे. चेन्नईचा संघ साखळी सामन्यानंतर गुणतालिकेत दुसर्या क्रमांकावर होता. तर कोलकाताचा संघ चौथ्या स्थानावर होता. आधी क्वालिफायरमध्ये चेन्नईने दिल्लीला धावाचा पाठलाग करताना मात दिली आणि थेट अंतिम सामन्यात पोहोचली होती. त्यानंतर कोलकाताने एलिमिनेटर सामन्यात धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला होता. क्वालिफायर -२ मध्ये कोलकाताचा सामना दिल्लीशी झाला. केकेआरने धावांचा पाठलाग करताना दिल्लीला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. म्हणजेच २०१२ मध्ये जे झाले त्याच्या बरोबर उलटे आता होत आहे. आता अंतिम सामन्यात चेन्नई आणि कोलकाता आमनेसामने आले आहेत.
२०२१ आयपीएल
गुणतालिकेत (साखळी सामन्यांनंतर) सीएसके (दुसर्या), केकेआर (चौथ्या)
क्वालिफायर -१ सीएसकेकडून डीसीचा पराभाव
एलिमिनेटर केकेआरचा विजय (धावांचा पाठलाग)
क्वालिफायर -२ केकेआरकडून डीसीचा पराभव
फायनल ?
या योगायोगाच्या हिशेबानुसार निष्कर्ष काढला तर, अंतिम सामन्यात चेन्नई प्रथम फलंदाजी करून कोलकाताला पराभूत करू शकते. परंतु आजच्या सामन्यात काय होणार हेच पाहावे लागणार आहे. कोणीही जिंकले तरी अंतिम सामना रंगतदार होईल हे निश्चित.