मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारताने ९ गडी राखून वेस्ट इंडिज विरुद्धचा चौथा टी २० सामन्यात विजय मिळवला. चौथ्या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने मालिकेत १-१ ने बरोबरी केली आहे. आता पाचवा आणि शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यात शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी दीड शतकी भागीदारी केली. त्यांच्या आक्रमक खेळीपुढे विंडीज बॉलर हतबल दिसून आले. या सामन्यात भारताने विंडिजचा नऊ विकेटने पराभव केला. वेस्ट इंडिजने दिलेले १७९ धावांचे आव्हान भारताने १८ चेंडू आणि ९ विकेट राखून सहज पार केले. यशस्वी जयस्वाल याने नाबाद ८४ तर शुभमन गिल याने ७७ धावांची खेळी केली. या विजयासह भारताने मालिकेत २-२ अशी बरोबरी केली आहे. रविवारी निर्णायक आणि अखेरचा सामना होईल.
गिल आणि यशस्वीने पहिल्या सहा षटकात ६६ धावा केल्या होत्या. या जोडीने दहा षटकात शतकी भागिदारी केली. यशस्वी आणि गिल या जोडीने भारतासाठी टी20 मधील सर्वोच्च भागिदारीची नोंद केली. याआधी हा विक्रम रोहित आणि राहुल यांच्या नावावर होता. अखेरच्या काही षटकात गिल बाद झाला पण तोपर्यंत सामना भारताच्या बाजूने झुकला होता.
भारताचा डाव
वेस्ट इंडिजने २० षटकांच्या खेळात ८ गडी गमवून १७८ धावा केल्या आणि विजयासाठी १७९ धावांचं आव्हान दिले होते. हे आव्हान भारताच्या सलामी जोडीने अगदी सोपे केले. भारताकडून शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानात उतरली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी दीड शतकी भागीदारी केली. शुभमन गिल ७७ धावा करून तंबूत परतला.
वेस्ट इंडिजचा डाव
पाटा पिचवर वेस्ट इंडिज संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. शाय होप्स आणि शिम्रॉन हेटमायर वगळता एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकले नाही. खरं तर नाणेफेकीचा कौल विंडीजच्या बाजून लागला होता. त्यामुळे २०० पार धावा होतील असा अंदाज होता. पण भारतीय गोलंदाजांनी त्यांना रोखलं. शिम्रॉन हेटमायरने ३९ चेंडूत ६१ धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंगने ३, कुलदीप यादवने २, तर अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
West Indies vs India, 4th T20I