इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – व्यसन तथा नशा हा वाईट प्रकार असतो, मग ती कोणत्याही पदार्थाची नशा असो. मग एखादे मद्य असो की आणखी विडी, सिगारेट किंवा गुटखा, तंबाखू .मात्र अलीकडच्या काळात नशा करण्यासाठी अल्पवयीन मुले आणि तरुण वेगवेगळे प्रकार शोधून काढतात. अगदी व्हाईटनर असो की खोकल्याचे औषध यापासून नशा करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसात वाढले आहेत. परंतु पश्चिम बंगालमध्ये यापेक्षाही आगळावेगळा आणि भयानक प्रकार सध्या सुरू आहे, ते ऐकून किंवा वाचून कुणालाही आश्चर्य वाटेल. परंतु हे सत्य आहे.
शारीरिक संबंध करताना कंडोमचा वापर करतात, त्यामुळे नको असलेली गर्भधारणा टाळण्यास मदत होते. शिवाय लैंगिक आजारांपासून देखील सुरक्षित ठेवू शकता, असा सल्ला वैद्यकिय तज्ज्ञ देतात. पण काही बेवडे किंवा गंजेडी या कंडोमचा वापर भलत्याच कामासाठी करत आहेत. ही नशेली मंडळी चक्क कंडोमपासून नशापाणी करत आहेत. त्यांना दारू, सिगरेट किंवा अंमली पदार्थांप्रमाणेच कंडोमची नशा करण्याचे व्यसन लागले आहे. यामुळे अचानक कंडोमची मागणी वाढली. मात्र बंगाली पोलीसांना नेमके कारण माहिती नसल्याने ते देखील चक्रावले आहेत.
प. बंगालमध्ये सध्या कंडोमची मागणी अचानक वाढली आहे. यात प्रामुख्याने फ्लेवर्ड कंडोम हे मोठ्या प्रमाणावर विकले जाताये. ग्राहक इतक्या मोठ्या प्रमाणावर कंडोम विकत घेता आहेत की आता दुकानांमध्ये टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी काही मंडळींना कंडोमचा काळा बाजार करताना पोलिसांनी पकडले आहे. पण कंडोम अचानक इतक्या मोठ्या प्रमाणावर का विकले जाताय आहे ? हा प्रश्न पोलिसांना देखील पडला होता. जेव्हा त्यांनी या प्रकरणी अधिक चौकशी केली तेव्हा त्यामागील खरे कारण समोर आले.
तरुणाध्ये नशा करण्यासाठी नवा भयानक प्रकार दिसतो आहे. अनेक तरुण नशा करण्यासाठी कंडोमचा उपयोग करत असल्याचे समोर आले आहे. पश्चिम बंगालच्या दुर्गापूर परिसरात दुर्गापूर सिटी सेंटर, बिधान नगर, बेनाचिती आणि मुचिपारा परिसरात फ्लेवर्ड कंडोम दुकानांत नावालाही शिल्लक राहिलेले नाहीत. या काही दिवसांपासून अचानक वाढलेल्या कंडोमच्या विक्रीमुळे दुकानदारही आश्चर्यचकित होते. त्यांनाही ही विक्री अचानक का वाढते आहे, याचे कारण कळत नव्हते. एका दुकानदाराने तर याबाबत खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाकडे विचारणाही केली होती. मात्र त्यावर तरुणाने उत्तर देण्याचे टाळले.
एका दुकानदारांनी सांगितले की, नशा करणारे तरुण या कंडोमचा उपयोग वाफ घेण्यासाठी करतात. अनेक जण इतर नशा करण्याऐवजी आता कंडोमची वाफ घेऊ लागले आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने याबाबतचे एक संशोधन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार कंडोममध्ये एरोमॅटिक कम्पाऊंड असतात, हे कम्पाऊंड विरघळल्यानंतर त्याचे रुपांतर अल्कोहोलमध्ये होते. त्यामुळे त्याचे व्यसन लागण्याची शक्यता असते. सध्या हाच प्रकार प. बंगालात घडताना दिसतो आहे.
या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, जर कंडोमला बराच काळ पाण्यात उकळत ठेवले तर त्याच्यातील अल्कोहोल असणारे द्रव्य हे पाण्यात मिसळते. हे नशा करणारे तरुण अशाच प्रकारे कंडोम उकळून, त्याची वाफ घेत असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तर हे कंडोम उकळलेले पाणीही काही तरुण नशा करण्यासाठी पित असल्याची माहिती समोर आली आहे, मात्र हा प्रकार आरोग्यासाठी अत्यंत घातक असून असा प्रयोग कोणीही करू नये असा इशारा आरोग्य तथा वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे.
West Bengal Youth Condom Use for Different Purpose