इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पश्चिम बंगालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज तुफान राडा झाला. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या आमदारांमध्ये जोरदार बेचाबाची झाली. बीरभूम येथे झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात भाजप आमदारांनी आवाज उठविला. या मुद्द्यावर तातडीने चर्चा करावी, अशी आग्रही मागणी भाजप आमदारांनी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असल्याने सत्ताधारी तृणमूलने अन्य विषयांवर भर देण्याचे आवाहन केले. त्यात दोन्ही आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. त्याचे रुपांतर बाचाबाची आणि नंतर तुफान राड्यात झाले. यावेळी आमदारांनी एकमेकांना मारहाणही केली. तर, काहींनी आमदारांचे कपडेही फाडले. तृणमूलचा एक आमदार यात जखमी झाला आहे. विधिमंडळातील सुरक्षा रक्षकांनी हा सर्व प्रकार थांबविण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्यांना काही वेळाने यश आले. अखेर ही परिस्थिती पाहता सभापतींनी कामकाज स्थगित केले.
https://twitter.com/amitmalviya/status/1508333203530018816?s=20&t=SmrG7w03ko0hJGWA_Olokg