इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पती-पत्नीचे नाते हे विश्वास आणि प्रेमावर आधारित असते तसेच आई आणि मुलाचे नाते हे अत्यंत पवित्र मानले जाते. परंतु एखाद्या नात्यांमध्ये संशय निर्माण झाला तर त्यात त्यातून काही विपरीत घटना घडू शकते. त्यातून कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यात अशीच एक भयानक घटना घडली आहे. येथे एका महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. ही हत्या तिच्या पतीनेच केल्याचा आरोप होत आहे. हत्येच्या घटनेनंतर तो फरार झाला आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे त्या विकृत माणसाला त्याची पत्नी आणि मुलगा यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या प्रकरणी आरोपीच्या मुलीने त्याच्याविरोधात तक्रार दिली आहे.
धारदार हत्याराने अनेक वार
प. बंगालमधील कालना तालपुकूर येथे एक कामगार मदन बाग हा त्याची पत्नी ठाकुरानी बाग, दोन मुली आणि एका मुलासह राहतो. मदन बऱ्याच दिवसांपासून स्वत:ची पत्नी आणि मुलामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत होता. त्यामुळे हा मुलगा मामाकडे राहतो. तो मालदा येथील एका हॉटेलमध्ये काम करतो. तसेच आता तो घरी आला होता. तिच्या आईने मुलाला पाहणयाची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरूनच तिचे आणि तिच्या पतीचे भांडण झाले. त्यानंतर डोक्यात संशयाचा सैतान शिरलेल्या पतीने पत्नीची धारदार हत्याराने अनेक वार करून हत्या केली आणि फरार झाला.
अंथरुणावर आई रक्ताच्या थारोळ्यात, मुलीचा आक्रोश
त्या महिलेवर हत्याराने वार केल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात खोलीमध्ये पडून होती. त्यानंतर सकाळी दोन्ही मुलींना आई खोलीतून बाहेर आलेली दिसली नाही. त्यामुळे छोटी मुलगी धावत तिच्याजवळ आली. तिने अंथरुणावर आईला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले. या घटनेने मुलींनी आक्रोश केला. त्यानंतर नातेवाईक आणि शेजारच्या लोकांना माहिती देण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येत मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला. या प्रकरणी महिलेच्या धाकट्या मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी चौकशी पथक पाठविले आहेत.