इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पश्चिम बंगालमधील हावडा येथे रामनवमीनिमित्त शोभा यात्रेदरम्यान हिंसाचार झाला. ज्यामध्ये दोन समुदाय आमनेसामने आले आणि जोरदार दगडफेक आणि जाळपोळ झाली. आता आज पुन्हा हावडामध्ये हिंसाचाराची बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी पुन्हा एकदा हिंसाचार झाला आणि हावडामधील शिवपूर येथे दगडफेक झाली. याआधी गुरुवारी उसळलेल्या हिंसाचारात दोन समुदाय समोरासमोर आले. त्यानंतर प्रचंड दगडफेक झाली आणि अनेक वाहनांना आग लावण्यात आली.
हावडा येथील हिंसाचारावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे वक्तव्यही समोर आले आहे. त्या म्हणाले की, आम्ही कोणत्याही मिरवणुकीवर बंदी घातली नाही. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेशी खेळणे खपवून घेतले जाणार नाही. हावडा हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत ४१ जणांना अटक करण्यात आले आहे. हिंसाचार भडकावणारे हिंदू नव्हते, त्यांना बाहेरून आणले होते. भाजपला बंगालला त्रास द्यायचा आहे. अल्पसंख्याक समाजातील लोक रमजानमध्ये व्यस्त असल्याने हिंसाचारात सहभागी होत नाहीत, असे बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.
https://twitter.com/kumarsubodh_/status/1641725907210739713?s=20
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, रमजानचा महिना सुरू आहे आणि मुस्लिम या महिन्यात कोणतेही गैरकृत्य करत नाहीत. माझे डोळे आणि कान उघडे आहेत. मी सर्व काही वास घेऊ शकते. मुस्लिम भागातून मिरवणूक काढताना मी त्यांना इशारा दिला होता की त्यांनी रामनवमीची रॅली काढल्यास हिंसाचार होऊ शकतो. कोणाला विचारून त्यांनी शोभा यात्रेचा मार्ग बदलला? जेणेकरून एखाद्या समुदायाला लक्ष्य करता येईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, रामनवमीच्या मुहूर्तावर देशातील अनेक भागात हिंसाचार झाला आहे. हावडा व्यतिरिक्त गुजरातमधील वडोदरा, महाराष्ट्रातील संभाजीनगर आणि जळगाव येथेही हिंसाचार झाला.
https://twitter.com/ANI/status/1641721153713582080?s=20
West bengal Crime Howrah Stone Pelting Fire Clashes