इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मुंबई शहरात जन्मलेले मात्र सन २००० पासून अमेरिकेत रहात असलेले सलमान रश्दी (वय ७५) हे त्यांच्या वादग्रस्त लेखनासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. सन १९८० च्या दशकात इराणकडून त्यांना त्यांच्या वादग्रस्त लिखाणासाठी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. मात्र आता बुकर पुरस्कार विजेते असलेल्या सलमान रश्दी यांच्यावर काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील एका कार्यक्रमात हल्लेखोराने व्यासपीठावर जाऊन रश्दी यांच्यावर चाकूहल्ला केला होता. या हल्ल्यात रश्दी गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सुमारे १५ वार करण्यात आल्याने गंभीर जखमी झालेल्या रश्दी यांचा एक डोळा निकामी झाला असून त्यांना आता एकाच डोळ्यांनी दिसत आहे.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी न्यूयॉर्क शहरात एका कार्यक्रमात बोलण्यासाठी जेव्हा ते व्यासपीठावर आले, तेव्हाच त्यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. २० सेकंदात त्यांच्यावर १५ वार करण्यात आले. त्यात खूप रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती नाजूक असून गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांचा एक डोळा अधू झाल्याची माहिती नुकतीच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. तसेच त्यांचा एक हातही निकामी झाल्याचे समजते.
याबाबतची अधिक माहिती रश्दींचे एजंट अँड्र्यू वायली यांनी एका मुलाखतीत दिली आहे. या हल्ल्यात रश्दी यांच्या शरीरावर अनेक खोल जखमा होत्या. डोळ्यावर वार झाल्याने त्यांनी एका डोळ्याची दृष्टी गमावली आहे. तसेच त्यांच्या मानेवर तीन गंभीर आहेत. तसेच त्यांच्या हाताच्या नसा कापल्या गेल्याने त्यांचा एक हात निकामी झाल्याची माहितीही वायली यांनी दिली. रश्दी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत पण महत्त्वाची बाब म्हणजे इतका मोठा हल्ला होऊन देखील रश्दी यांची जगण्याची इच्छा शक्ती प्रचंड आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वायली यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना न्यूयॉर्कमधील पोलिसांनी सांगितले की, एका साहित्यिक कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यांच्यावर एका अनोळखी व्यक्तीने चाकूने वार करून हल्ला केल्याची घटना घडली आहे. ते व्याख्यान देण्यासाठी पोडीयमकडे असताना त्यांच्यावर मागून कोणीतरी मानेवर हल्ला केल्याने ते जखमी झाले. त्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
संशयित हल्लेखोराला न्यू जर्सीमधून तब्यात घेतले आहे. त्याच्याकडे एक बॅग आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरण मिळाले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. सुमारे ४० वर्षापूर्वी इराणकडून त्यांना त्यांच्या लिखाणासाठी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या, रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकावर १९८८ पासून इराणमध्ये बंदी आहे. दिवंगत इराणचे नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी रश्दी यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणारा फतवा जारी केला होता. पुस्तकात महंमद पैगंबरांची निदा आहे, असा आरोप ठेवून भारतातही सलमान रश्दी यांच्या सॅटानिक व्हर्सेस या पुस्तकावर बंदी घातली गेली होती. तसेच अनेक देशांमध्ये या पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून रश्दी हे मुस्लीम कट्टरवाद्यांचे वारंवार लक्ष्य बनले आहेत.
Well Known Autor Salman Rashdi Health Status